Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार असलेल्या सराईत गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांनी एमआयडीसी परिसरातून जेरबंद केले. वसीम कादीर कुरेशी (वय २८, रा हमालपाडा आंबेडकर चौक झेंडी गेट, ता. जि. अहिल्यानगर, हल्ली रा. नागापूर ता.जि. अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की, जिल्ह्यातून हद्दपार असलेला सराईत गुन्हेगार वसीम कुरेशी एमआयडीसी लामखेडे चौक परिसरात फिरत आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी लामखेडे चौकात पाठलाग करुन वसीम कादीर कुरेशी याला पकडले.

पोलिस अधीक्षकांच्या प्रस्तावानुसार वसीम कुरेशी याला एक वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. तो हद्दपारीचा आदेशाचा भंग करून एमआयडीसी परिसरात फिरत होता. त्याला ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी, उपनिरीक्षक विनोद परदेशी, सहायक फौजदार राकेश खेडकर, पोलिस अंमलदार शैलेश रोहोकले, सचिन आडबल, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे यांच्या पथकाने केली.