रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ; महाराष्ट्रातून धावणार नवीन एक्सप्रेस ! राज्यातील ‘या’ 16 स्टेशनवर थांबा घेणार

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातून धावणाऱ्या एका विशेष एक्सप्रेस ट्रेनला मुदत वाढ देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय. ऐन गणेशोत्सवाच्या आधीच या ट्रेनला मुदतवाढ मिळाली असल्याने गणेश भक्तांना याचा मोठा फायदा होणार आहे. 

Published on -

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. ती म्हणजे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या एका विशेष एक्सप्रेस ट्रेनला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाडीला मुदतवाढ मिळाली कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकण रेल्वे मार्गावर वाढलेल्या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर उधना ते मंगळूरू दरम्यान विशेष गाडी सुरू करण्यात आली होती. दरम्यान आता याच दिवसाप्ताहिक विशेष गाडीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

रेल्वेचा निर्णय काय 

रेल्वेने उधना ते मंगळूरु विशेष एक्सप्रेस ट्रेन ला जो प्रतिसाद मिळतोय तो प्रतिसाद पाहता या गाडीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही गाडी आठवड्यातून दोनदा धावते म्हणजेच एक द्विसाप्ताहिक विशेष गाडी आहे.

उधना – मंगळूरु – उधना द्विसाप्ताहिक विशेष गाडीला( गाडी क्रमांक 09057/09058 ) 29 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. विशेषता गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.

ही गाडी महाराष्ट्रातील तब्बल 16 महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे यामुळे राज्यातील बहुतांशी भागांमध्ये नागरिकांना या विशेष गाडीचा लाभ मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे वेळापत्रक कसे आहे याबाबत माहिती पाहूयात.

कस आहे वेळापत्रक

या गाडीचे वेळापत्रक मुदतवाढ दिल्यानंतरही तेच ठेवण्यात आले आहे. रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, गाडी क्रमांक 09057 म्हणजे उधना-मंगळूरू द्विसाप्ताहीक विशेष गाडी 29 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक बुधवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता उधना जंक्शनहून सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री सात वाजून 45 मिनिटांनी ही गाडी मंगळूरू जंक्शनला पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर गाडी क्रमांक 09058 ही द्विसाप्ताहिक विशेष गाडी दर गुरुवारी आणि सोमवारी रात्री 10 वाजून दहा मिनिटांनी मंगळुरु जंक्शनहून रवाना होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी ही गाडी उधना रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहे.

महाराष्ट्रातील कोण कोणत्या स्थानकावर थांबा घेणार 

ही गाडी कोकणातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे. राज्यातील पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड़, चिपळूण, सावर्डा, संगमेशवर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड या कोकणातील रेल्वे स्थानकावर या विशेष गाडीला थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe