Bank Of Baroda FD Scheme : एफडी मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण बँक ऑफ बडोदाच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत. खरे तर अलीकडील काही महिन्यांमध्ये फिक्स डिपॉझिट चे व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहेत.
यामुळे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना फटका बसतोय. पण जर तुम्हाला सध्याच्या स्थितीत फिक्स डिपॉझिटमध्ये पैसा गुंतवायचा असेल तर तुमच्यासाठी बँक ऑफ बडोदाची 400 दिवसांची एफडी योजना फायदेशीर ठरू शकते. कारण की आजही बँक ऑफ बडोदा च्या 400 दिवसाच्या एफडी योजनेतुन गुंतवणूकदारांना चांगले व्याज मिळत आहे.

कशी आहे बँक ऑफ बडोदाची 400 दिवसांची एफडी योजना ?
मिळालेल्या माहितीनुसार सध्या बँक ऑफ बडोदा एक वर्षांपासून ते चारशे दिवसांच्या कालावधीच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 6.50% दराने व्याज देत आहे.
मात्र याच कालावधीच्या एफडी योजनेत जर सीनियर सिटीजन ग्राहकांनी म्हणजेच ज्या ग्राहकांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे त्यांनी जर गुंतवणूक केली तर त्यांना 0.50% अधिकचे व्याज मिळते म्हणजेच जेष्ठ नागरिक ग्राहकांना सात टक्के दराने व्याज मिळत आहे.
अर्थातच बँक ऑफ बडोदाची ही 400 दिवसांची एफडी योजना सामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठी अधिक फायद्याची ठरणार आहे. जर समजा एखाद्या ग्राहकाने बँक ऑफ बडोदा च्या 400 दिवसांच्या एफडी योजनेत चार लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना व्याज म्हणून 27 हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम रिटर्न मिळणार आहे.
444 दिवसांची एफडी योजना ठरणार अधिक फायदेशीर
दुसरीकडे बँक ऑफ बडोदा कडून 444 दिवसांची स्पेशल एफडी योजना देखील सुरू करण्यात आली आहे. या स्पेशल एफडी योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 6.65 टक्के दराने परतावा दिला जात आहे तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना यामध्ये गुंतवणूक केल्यास 7.15 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
म्हणजे जर या 444 दिवसांच्या योजनेत सामान्य ग्राहकाने 10 लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटी वर म्हणजे 444 दिवसांचा वेळ पूर्ण झाल्यानंतर दहा लाख 81,465 रुपये मिळणार आहेत. अर्थात 81,465 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळतील.