अहिल्यानगर जिल्ह्यात होणाऱ्या कोतवाल भरतीत दिव्यांगांना आरक्षण जाहीर करण्याची मागणी, तहसिलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Published on -

बालमटाकळी- अहिल्यानगर जिल्ह्यात तसेच सर्व तालुक्यांत महसूल विभागामार्फत कोतवाल (महसूल सहाय्यक) या पदासाठी शासनामार्फत भरती होणार असून, यामध्ये पद भरतीचे आरक्षण जाहीर करताना दिव्यांगांना डावलण्यात आले असून, सदर बाब दिव्यांगावर अन्याय करणारी तसेच दिव्यांगांना रोजगारपासून वंचित ठेवणारी गंभीर आहे, त्यामुळे कोतवाल पदभरतीत शुद्धीपत्रक काढून दिव्यांगांना आरक्षण जाहीर करावे, अशा मागणीचे लेखी निवेदन सावली दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष चॉदभाई शेख यांनी शेवगावचे तहसीलदार तसेच जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात एकूण रिक्त जागा १५८ जागांबाबत महसूल सेवक (कोतवाल) पदाची जाहिरात प्रसिध्द झाली असून, शासनाच्या निर्णयानुसार तसेच दिव्यांग अधिनियम २०१६ कायद्याप्रमाणे दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात समान संधी सामान अधिकार देण्याबाबत दिव्यांग व्यक्तीसाठी स्वतंत्र कायदा करण्यात आलेला आहे.

शासकीय, निमशासकीय तथा कंत्राटी पद भरतीत दिव्यांग संवर्गाकरिता ४% आरक्षण देण्याची तरतूद आहे. सदर महसूल सेवक ( कोतवाल) पद भरती जाहिरातीत इतर संवर्गाकरिता आरक्षणाची तरतूद केलेली आहे; परंतु दिव्यांग संवर्गाकरिता आरक्षणाची तरतूद करण्यात आलेले नाही. सदर बाब दिव्यांगांवर अन्याय करणारी तसेच दिव्यांगांना रोजगारपासून वंचित ठेवणारी गंभीर बाब आहे.

तसेच दिव्यांग व्यक्तींच्या हक्क व अधिकारावर गदा आणणारी आहे. जाहिरातीतील १५८ पदांपैकी कमीत कमी ६ ते ७ जागा दिव्यांग संवर्गाकरिता राखीव ठेवण्यात आल्या पाहिजे होत्या. त्याच बरोबर दिव्यांग संवर्गाकरिता वयाची अट देखील ४५ वर्षे इतकी असायला हवी होती; परंतु सदर पद भरतीत दिव्यांगांना डावलण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील रिक्त पदांनुसार व आरक्षणानुसार सदर पद भरतीत दिव्यांग संवर्गालादेखील संधी उपलब्ध करुन देणे महत्वाचे आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी जाहिरातीमध्ये शुद्धीपत्रक काढून जिल्हातील एकूण पदांमध्ये दिव्यांग संवर्गाकरिता ६ ते ७ जागांवर आरक्षणाची तरतूद करावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!