अहिल्यानगरमध्ये सावकारीचा परवाना रद्द असतांनाही सावकारकी करणं एकाला भोवलं, तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल

Published on -

अहिल्यानगर- सावेडी उपनगरातील बालिकाश्रम रस्त्यावरील ताठे मळा परिसरातील एका व्यक्तीचा सावकारकीचा परवाना रद्द झालेला असताना तो सावकारकी करताना आढळून आला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सचिन आदिनाथ ताठे (रा. ताठे मळा, बालिकाश्रम रोड सावेडी) असे त्या परवाना रद्द झालेल्या सावकाराचे नाव आहे. याबाबत उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपिक विशाल पांडुरंग आळकुटे रा. डोकेनगर, निर्मलनगर सावेडी यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

फिर्यादीत म्हटले की, सचिन आदिनाथ ताठे हे पूर्वी परवानाधारक सावकार होते. परंतु, त्यांचा परवाना केलेला आहे, असे असताना त्यांच्या दप्तराची तपासणी केला असता अल्ताफ गुलाब सय्यद यांना ७० हजार रुपयांचे कर्ज प्रॉमिसरी नोटवर दिल्याची नोंद सावकारी नियमांनुसार अधिकृत दप्तरात नोंदलेली नव्हती. त्यामुळे हा व्यवहार बेकायदेशीर सावकारी कायद्यानुसार गैर ठरतो.

१ डिसेंबर २०२३ रोजी सावकारी सहाय्यक निबंधक कार्यालयाने संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार २०२३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताठे यांचा
सावकारी परवाना क्र. ११४/नगर आधीच रद्द करण्यात आलेला असून, त्यांचे संपूर्ण सावकारी दस्तऐवज कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.

दप्तराच्या तपासणीत, लेजर खाते पान क्र. १२ व रोजकिर्द वही पान क्र. ८ वर अल्ताफ सय्यद यांचे कर्जदार म्हणून नाव नमूद असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सावकारी अधिनियमातील कलम २३ चे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार महाराष्ट्र सावकारी अधिनियमन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गणेश लबडे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!