अहिल्यानगर शहरातील ‘या’ भागामध्ये अनधिकृत गॅस रिफिलिंग करणाऱ्या सेंटरवर पोलिसांनी टाकला छापा, मुद्देमाल जप्त करत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

Published on -

अहिल्यानगर- सावेडी उपनगरातील वैदुवाडी येथील अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटरवर तोफखाना पोलिसांनी छापा घालून २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करुन एकास ताब्यात घेतले. ही कारवाई सावेडी परिसरातील वैदुवाडी येथे १० जुलै रोजी दुपारी केली.

तोफखाना पोलिसांनी छापा टाकून वैदुवाडी येथील गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकून संकेत दत्ता शिंदे (वय २१, रा. वैदुवाडी) याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून एक इलेक्ट्रिक मोटार, त्याच्याकडून एक इलेक्ट्रिक मोटार, रिफिलींग साठी वापरले जाणारे दोन पाइप्स, आणि एकूण ६ घरगुती गॅस सिलिंडर्स असा एकूण २३ हजारांचा अवैध गॅस रिफिलींगचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तपास पोलीस हवालदार बी. के. गिरी करीत आहेत. ही कारवाई पोनि. आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय. परशुराम दळवी, पोलीस हवालदार भानुदास खेडकर, योगेश चव्हाण, सुमित गवळी यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!