अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्यांच्या भावात झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आजचे दर?

Published on -

अहिल्यानगर- नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी विविध भाजीपाल्याची १९४१ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ४७८ क्विंटल बटाट्याची आवक झाली होती. यावेळी बटाट्याला १२०० ते २४०० रुपये भाव मिळाला. यावेळी टोमॅटोची ३९७ क्विंटल आवक झाली होती.

यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये भाव मिळाला. वांग्याची ५३ क्विंटल आवक झाली होती. यावेळी वांग्यांना २००० ते ८००० रुपये भाव मिळाला. बाजार समितीत पालेभाजांच्या २३ हजार ९८६ जुड्यांची आवक झाली होती. दरम्यान, बाजार समितीत वांगे, दोडका, कारले वालाच्या शेंगांना चांगला भाव मिळत आहे.

अहिल्यानगर बाजार समितीत शुक्रवारी काकडीची १३९ क्विंटल आवक झाली होती. काकडीला प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये भाव मिळाला. गवारीची ८ क्विंटल आवक झाली होती. गवारीला ५००० ते १३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. फ्लॉवरची ९९ क्विंटल आवक झाली होती.

फ्लॉवरला १००० ते ६००० रुपये भाव मिळाला. घोसाळ्याची १२ क्विंटल आवक झाली होती. घोसाळ्याला प्रतिक्विंटल १००० ते ५००० रुपये भाव मिळाला. दोडक्याची २६ क्विंटल आवक झाली होती.

दोडक्याला २००० ते ७००० रुपये भाव मिळाला. कारल्याची ४३ क्विंटलवर आवक झाली होती. कारल्याला प्रतिक्विंटल २००० ते ६००० रुपये भाव मिळाला. कैरीची १२ क्विंटलवर आवक झाली होती. कैरीला १५०० ते २५०० रुपये भाव मिळाला. भेंडीची ६१ क्विंटलवर आवक झाली होती. भेंडीला प्रतिक्विंटल १५०० ते ५००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

रताळ्याची ३६० क्विंटल आवक झाली होती. कोबीची १२२ क्विंटल आवक
झाली होती. कोबीला प्रतिक्विंटल ७०० ते २००० रुपये भाव मिळाला. वालाची १ क्विंटल आवक झाली होती. वालाला ७००० ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. घेवड्याची ९ क्विंटलवर आवक झाली होती. घेवड्याला प्रतिक्विंटल ५ हजार ते ९ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. बिटाची ४ क्विंटल आवक झाली होती.

बिटाला प्रतिक्विंटल २ हजार २४०० रुपये भाव मिळाला. वाटाण्याची साडेपाच क्विंटल आवक झाली होती. वाटाण्याला ७ हजार ते १५ हजार रुपये भाव मिळाला. डांगराची ३२ क्विंटल आवक झाली होती. डांगराला प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये भाव मिळाला. मका कणसाची १५ क्विंटल आवक झाली होती. मका कणसाला प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये भाव मिळाला. शिमला मिरचीची ६४ क्विंटल आवक झाली होती. शिमला मिरचीला २५०० ते ५००० रुपये भाव मिळाला.

हिरव्या मिरचीला ६००० रुपयांपर्यंत भाव

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी हिरव्या मिरचीची ४७क्विंटलवर आवक झाली होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल ३००० ते ६००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. लसणाची २६ क्विंटल आवक झाली होती. लसणाला प्रतिक्विंटल ४००० ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवग्याची ९९ क्विंटलवर आवक झाली होती. शेवग्याला प्रतिक्विंटल ३००० ते ६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. लिंबांची १६ क्विंटल आवक झाली. लिंबाला प्रतिक्विंटल ८०० ते २००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

मेथीला १५, तर पालक जुडीला १० रुपयांपर्यंत भाव

पालेभाजांच्या २३ हजार ९८६ जुड्यांची आवक झाली होती. यामध्ये मेथीच्या ९ हजार ८५० जुड्यांची आवक झाली होती. मेथी जुडीला ५ ते १५ रुपयांपर्यंत भाव मिळाला. कोथिंबिरीच्या १२ हजार ६०३ जुड्यांची आवक झाली. कोथिंबिरीच्या जुडीला २ ते ११ रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेपूच्या २८२० जुड्यांची आवक झाली होती. यावेळी शेपू भाजीच्या जुडीला ५ ते १० रुपयांपर्यंत भाव मिळाला. पालकच्या ४९८ जुड्यांची आवक झाली होती. पालक भाजीच्या जुडीला ७ ते १० रुपये भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!