शिर्डीतील गुरूपौर्णिमा उत्सावाची कितर्नानंतर दहिहंडी फोडून सांगता, हजारो साईभक्तांची उपस्थिती

Published on -

शिर्डी- श्री साईबाबा संस्थानच्यावतीने ९ जुलैपासून सुरु असलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाची प्राची व्यास, बोरीवली यांच्या किर्तनानंतर दहिहंडी फोडून सांगता झाली.

उत्सवाच्या सांगता दिनी सकाळी ६.५० वा. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा केली. तर सकाळी ७ वा. गुरुस्थान मंदिर येथे रुद्राभिषेक करण्यात आला.

सकाळी १० वाजता सुरु झालेल्या काल्याच्या किर्तनानंतर समाधी मंदिरात साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्य पारेश्वर कोते यांच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त उपस्थित होते.

त्यानंतर १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. दुपारी १ ते ३ या वेळेत रोहित दुग्गल, श्रीरामपूर यांचा साईभजन संध्या कार्यक्रम झाला. दुपारी ४ ते ६ या वेळेत हिमांशु जुनेजा, सहारणपुर यांचा साईभजन संध्या कार्यक्रम झाला. सायंकाळी श्रींची धुपारती व रात्री पद्मश्री मदनसिंह चौहान, रायपुर यांचा साई भजनसंध्या कार्यक्रम होऊन श्रींची शेजारती झाली.

हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्के), समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी, विभागप्रमुख, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!