कर्जत- ग्रामदैवत श्री संत सदगुरू गोदड महाराज यांचा रथयात्रा उत्सव कामिका एकादशीला सोमवार २१ जुलै रोजी संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत पंचायत समितीच्या सभागृहात शांतता कमिटीची आढावा बैठक तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला तसेच सुचनांची नोंद घेण्यात आली.
या बैठकीत रथयात्रेला मंदिरात तसेच रथावर होत असलेली अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी यात्रा कमिटीने ओळखपत्र द्यावीत, कडक शिस्त लावण्यासाठी कठोर निर्णय घ्यावेत, दुर्घटना घडू नये यासाठी आवश्यक पावले उचलावीत, सार्वजनिक बांधकाम विभाग व कर्जत नगरपंचायत यांनी रस्त्यांची दुरुस्ती करावी, शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी बायपास करणे, कर्जत एस टी बसस्थानकाच्या जागेवर पार्किंग व्यवस्था करावी, महाराष्ट्र शासनाची जागा परिवहन महामंडळाला भाड्याने देता येणार नाही, प्रवाशांसाठी दोन ठिकाणी वाहन तळाची व्यवस्था करावी, रथयात्रा काळात सीसीटीव्ही कॅमेरें व टेहळणी मनोरे उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले, उपनगराध्यक्ष संतोष म्हेत्रे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिल गदादे, भाजपाचे युवा नेते सचिन घुले, पाणी पुरवठा सभापती सतीश पाटील, बांधकाम सभापती भास्कर भैलुमे, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, मेघनाथ पाटील, सुरेश खिस्ती, दत्तात्रय शिंदे, बप्पाजी धांडे, नारायण नेटके, शहाजी नलवडे, पंढरीनाथ काकडे, सोमनाथ थोरात, दत्तात्रय नलवडे, मानकरी, पुजारी, ग्रामस्थ, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, गटविकास अधिकारी कर्जत पंचायत समिती अक्षय सुर्यवंशी, वैद्यकीय अधिक्षक आरती भारती, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप व्हरकटे, महावितरण, आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जत नगरपंचायत, कर्जत पंचायत समिती यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्लास्टिक मुक्तीचा निर्धार
धाकट्या पंढरीत रथयात्रेला लाखो भाविक हजेरी लावतात तसेच येथे व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर येतात, सर्वत्र प्लास्टिकचा वापर वाढला आहे. यामुळे कचरा मोठ्या प्रमाणात साठतो यामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण लक्षणीय असते. प्लास्टिकचा कचरा संकलन करण्यासाठी कर्जत नगरपंचायतीच्यावतीने भोत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे प्लास्टिकच्या कचरा होणार नाही यामुळे कर्जत शहर प्लास्टिक मुक्त होईल. या अभियानासाठी सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांची मदत घेण्यात येईल.
सचिन घुले, युवा नेते कर्जत