…अन्यथा जातेगाव- नगर- शिरूर महामार्गावरील टोलनाका बंद करा, मनसेचे रविश रासकर यांचा प्रशासनाला इशारा

Updated on -

जातेगाव- नगर- शिरूर महामार्गावर वाहनधारकांना आवश्यक असणाऱ्या मूलभूत योग्य त्या सुविधा द्या अन्यथा टोल घेणे बंद करा. असा इशारा मनसेचे रविश रासकर यांनी दिला आहे.

नगर- शिरूर महामार्गावर ठीक ठिकाणी डिव्हायडर फोडलेले आहेत व कुठल्याही अधिकृत डिव्हायडरवर रस्ता क्रॉस करताना लायटिंग पट्टी नाही. सूचना फलक नाहीत. गावच्या ठिकाणी जेथे अधिकृत डिव्हायडर आहे तेथे प्रत्येक ठिकाणी दोन्ही साईडकहुन स्पीड ब्रेकर देखील नाहीत.

सुपा टोल नाक्यावर जेसीबी, अॅम्बुलन्स, क्रेन या प्रकारची इमर्जन्सी कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. तसेच जातेगाव फाटा या ठिकाणी अनेकदा भीषण अपघात झाले आहेत व होत आहेत. या अपघातात अनेकजण मृत्युमुखी पडलेले आहेत.

तीन दिवसांपूर्वी नितीन शेळके नावाचा युवक जातेगाव फाट्यावर रस्ता क्रॉस करताना कुठल्याही प्रकारचे लाइटिंग पट्टी सूचनाफलक आणि स्पीड बेक्रर नसल्यामुळे मृत्युमुखी पडला. याला कारणीभूत सर्वस्वी सुपा टोल नाका मॅनेजमेंट जबाबदार आहे. त्यानंतर नगर- शिरूर महामार्गावर सुपा टोल मॅनेजमेंटच्या अधिपत्याखाली या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह वाहधारकांना प्रत्येक प्रकारच्या सुख सुविधा दिल्या गेल्या पाहिजे.

महामार्गावरील सूचनाफलकांवर अनावश्यक होल्डिंग लावले आहेत. तरी आगामी १५ दिवसात या सर्व सुधारणा न झाल्यास सुपा टोल नाक्यावर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा रविश रासकर यांनी सुपा टोल नाका प्रशासनाला दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!