पुढील २५ वर्ष तुमच्या मुला-बाळांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही- माजी खासदार सुजय विखेंची शेतकऱ्यांना ग्वाही

Published on -

राहाता- “गोदावरी कालव्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील २५ वर्षे आपल्या मुलाबाळांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही, असा शब्द मी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने देतो,” असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

राहाता तालुक्यातील एकरुखे येथे नाशिक पाटबंधारे विभागाच्या गोदावरी कालवे तुलाकरण उपविभाग क्रमांक १, नाशिक अंतर्गत उजव्या तट कालव्यामधून एकरुखे गावासाठी नवीन अतिवाहक (एस्केप) कामाचे भूमिपूजन डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, “गणेश परिसरामध्ये पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवली जाणार असून, उजव्या कालव्याच्या उपचाऱ्यांसाठी ३०२ कोटी रुपये खर्चास तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. हे कामही लवकरच पूर्ण होईल. चारी क्रमांक १ ते २० पर्यंतच्या उपचाऱ्यांचे काम देखील पुढील पाच वर्षांत पूर्ण होईल.”

याप्रसंगी एकरूखे ग्रामस्थांच्या वतीने जालिंदर गाढवे यांनी मनोगत व्यक्त करत मंजूर कामाबद्दल मंत्री विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांचे आभार मानले.

कार्यक्रमास पाटबंधारे विभागाचे सोनल शहाणे, आल्हाट, खैरनार, कवडे, खेमनर, जंगले, गिते हे अधिकारी तसेच ग्रामविकास अधिकारी प्रमोद कानडे, सहाय्यक कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सरपंच जितेंद्र गाढवे, संचालक जालिंदर गाढवे, माजी उपसरपंच जगन्नाथ सोनवणे, रामदास सोनवणे, माजी संचालक देवेंद्र भवर, भाऊसाहेब गाढवे, श्री गणेशचे माजी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe