रिझर्व बँक ऑफ इंडियाची ‘या’ 2 बड्या बँकांवर कठोर कारवाई ! ग्राहकांवर काय परिणाम होणार ?

आरबीआयकडून अलीकडेच देशातील दोन बड्या बँकांवर मोठी कठोर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान आता आपण आरबीआयच्या याच कारवाईबाबत माहिती पाहणार आहोत. 

Published on -

Banking News : आरबीआयकडून गेल्या काही महिन्यांच्या काळात देशभरातील अनेक सहकारी, सहकारी आणि खाजगी बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच आरबीआय एनबीएफसी कंपन्यांवर सुद्धा कारवाई केलेली आहे.

दंडात्मक कारवाई करण्यासोबतच आरबीआयकडून देशातील काही बँकांचे लायसन्स सुद्धा रद्द करण्यात आलेले आहेत तसेच काही बँकांवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. अशातच, आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून पुन्हा दोन बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

या दोन बँकांवर झाली दंडात्मक कारवाई 

मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआयने एचडीएफसी आणि श्रीराम फायनान्स लिमिटेड या एनबीएफसी कंपनीवर दंडात्मक कारवाई केलेली आहे. यामुळे या बँकांमधील ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या दंडात्मक कारवाईचा ग्राहकांवर काय परिणाम होणार ? याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता देखील पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आता आपण आरबीआयने एचडीएफसी आणि श्रीराम फायनान्स लिमिटेड या बँकेवर किती रुपयांचा दंड ठोठावला आहे आणि या कारवाईचा ग्राहकांवर काय परिणाम होणार याबाबतची माहिती पाहणार आहोत.

आरबीआयने एचडीएफसी बँकेवर 4.88 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे. ही बँक देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत येते. आरबीआयने या बँकेला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत ठेवले आहे.

पण, ग्राहकांना कर्ज देताना परकीय गुंतवणुकीशी संबंधित काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेवर दंडात्मक कारवाई केलेली आहे. श्रीराम फायनान्स लिमिटेड बाबत बोलायचं झालं तर या एनबीएफसी कंपनीला 2.70 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

श्रीराम फायनान्सच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात आरबीआयने वैधानिक तपासणी केली यात श्रीराम फायनान्सकडून मध्यवर्ती बँकेच्या सूचनांचे पालन झाले नसल्याचे आढळून आले आणि यामुळे या एनबीएफसी कंपनीवर दंडात्मक कारवाई झाली.

ग्राहकांवर काय परिणाम होणार? 

आरबीआयच्या या कारवाईमुळे खाजगी क्षेत्रातील अधिक एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांमध्ये आणि श्रीराम फायनान्स लिमिटेड च्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु या कारवाईचा सदरील बँकेच्या ग्राहकांवर कोणताच परिणाम होणार नाही.

ही कारवाई बँकेवर झालेली आहे आणि दंडाची रक्कम बँकांकडूनच वसूल होणार आहे. या कारवाईमुळे बँक आणि ग्राहक यांच्यातील व्यवहारावर कोणताच परिणाम होणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी चिंता करू नये असे आवाहन जाणकारांकडून करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!