Banking News : आज 12 जुलै 2025 रोजी महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशभरातील सरकारी आणि खाजगी बँकांना सुट्टी आहे. उद्या 13 जुलै रविवार असल्याने संपूर्ण देशभरातील बँका बंद राहतील. एवढेच नाही तर 14 जुलैला देखील देशातील काही राज्यांमधील बँकांना सुट्टी राहणार आहे.
म्हणजेच 12 जुलैपासून सलग तीन दिवस देशातील बँका बंद राहणार आहेत. खरे तर आज महिन्याचा दुसरा शनिवार आणि उद्या रविवार असल्याने अनेक जण सोमवारी बँकेत जाऊन बँकेशी निगडित कामे करण्याच्या तयारीत असतील.

पण सोमवारी सुद्धा काही बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेत जाण्याआधी तुम्ही आजची ही बातमी पूर्ण वाचायला हवी. कारण की आज आपण 12 ते 31 जुलै 2025 दरम्यान बँका कोणकोणत्या तारखांना बंद राहणार याची यादी पाहणार आहोत.
12 जुलै ते 31 जुलै दरम्यानच्या सुट्ट्या
12 जुलै 2025 : आज दुसरा शनिवार असल्याने देशभरातील सरकारी आणि खाजगी बँका बंद राहणार आहेत.
13 जुलै 2025 : रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी म्हणून देशभरातील बँकांना कुलूप राहणार आहे.
14 जुलै 2025 : बेह देइनखलम सणानिमित्त या दिवशी शिलाँग येथे बँका बंद राहणार असल्याची माहिती आरबीआयकडून देण्यात आली आहे.
16 जुलै 2025 : देहरादून ( उत्तराखंड ) येथे हरेला पर्वच्या निमित्त या दिवशी बँका बंद राहतील अशी माहिती आरबीआयची वेबसाईटवरून समोर आली.
17 जुलै : यू तिरोत सिंह यांच्या पुण्यतिथीनिमत्त शिलाँग येथे बँका बंद राहणार आहेत.
19 जुलै : अगरतला ( त्रिपुरा ) मध्ये केर पूजेनिमित्त या दिवशी बँकांना सुट्टी राहणार आहे.
20 जुलै : रविवार असल्याने संपूर्ण देशातील खाजगी आणि सरकारी बँकांना सुट्टी राहणार आहे.
26 जुलै : चौथ्या शनिवारनिमित्त संपूर्ण देशातील बँका या दिवशी बंद राहणार आहेत.
27 जुलै : रविवार निमित्ताने संपूर्ण देशातील खाजगी आणि सरकारी बँका बंद राहतील.
28 जुलै : गंगटोक ( सिक्किम ) मध्ये द्रुकपा त्ये-जी उत्सवानिमित्त या दिवशी बँका बंद राहणार असून ही या महिन्याची शेवटची सुट्टी राहणार आहे.