मुंबई – पुणे प्रवासाचे अंतर 30 मिनिटांनी कमी होणार ; मिसिंग लिंक ‘या’ तारखेला सुरू होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

मुंबई ते पुणे हा प्रवास नव्या वर्षापासून सुपरफास्ट होणार आहे. कारण की मुंबई - पुणे महामार्गावर मिसिंग लिंक विकसित केली जाणार असून या मिसिंग लिंक प्रोजेक्टमुळे मुंबई आणि पुणे दरम्यानच्या प्रवासाचे अंतर 30 मिनिटांनी कमी होईल अशी आशा आहे.

Published on -

Mumbai – Pune Expressway : मुंबई ते पुणे दरम्यान चा प्रवास लवकरच वेगवान होणार आहे. या दोन्ही शहरादरम्यानचे प्रवासाचे अंतर 30 मिनिटांनी कमी होणार आहे. कारण की खोपोली ते कुसगाव दरम्यान विकसित होणाऱ्या नव्या मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आले आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळाकडून खोपोली ते कुसगाव दरम्यान मिसिंग लिंक तयार केली जात आहे. या प्रकल्पाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांनी नुकतीच पाहणी सुद्धा केली आहे. यामुळे येत्या काही महिन्यांनी हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार अशी शक्यता आहे. 

कसा आहे प्रकल्प? 

खोपोली ते कुसगाव दरम्यान होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांची भीती पाहता मिसिंग लिंक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत 19.80 किलोमीटर लांबीची नवीन मार्गिका बांधली जात आहे. या प्रकल्पाचे काम एकूण दोन टप्प्यात केले जात असून 2019 मध्ये या प्रकल्पाच्या कामाची सुरुवात झाली आहे.

या प्रकल्पात दोन बोगद्यांचा सुद्धा समावेश आहे. यातील एक बोगदा 1.75 किलोमीटरचा तर दुसरा एक बोगदा 8.92 किलोमीटर लांबीचा आहे. यातील दुसरा बोगदा म्हणजेच 8.92 किलोमीटर लांबीचा बोगदा हा भारतातील सर्वात रुंद बोगदा आहे.

एवढेच नाही तर तो आशिया खंडातील सर्वांत रुंद डोंगराखालून आणि तलावाखालून जाणारा बोगदा असल्याचेही बोलले जात आहे. या बोगद्याची रूंदी 23.75 किलोमीटर इतकी आहे.

या प्रकल्पात जे बोगदे विकसित होत आहेत त्यामुळे घाट सेक्शनला बायपास करता येणे शक्य झाले आहे. या बोगद्यांमध्ये सर्व प्रकारच्या हायटेक सोयी सुविधा आहेत. प्रकल्पाच्या कामाबाबत बोलायचं झालं तर या प्रकल्पाचे आत्तापर्यंत 94% काम पूर्ण झाले आहे. 

कधी सुरू होणार मिसिंग लिंक ?

मिसिंग लिंक प्रकल्पाचे आत्तापर्यंत 94 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित सहा टक्क्यांचे काम देखील अगदीच युद्ध पातळीवर सुरू आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने डिसेंबर 2025 अखेरपर्यंत हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचे टार्गेट ठेवलेले आहे.

दरम्यान या प्रकल्पाची राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतीच पाहणी केली असून यावेळी मुख्यमंत्र्यांनी एम एस आर डी सी चे विशेष कौतुक केले. या मुंबई ते पुणे प्रवास वेगवान बनवणाऱ्या प्रकल्पाचे 94 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि हा प्रकल्प डिसेंबरमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन राज्य रस्ते विकास महामंडळाचे आहे.

मात्र, हा प्रकल्प जर डिसेंबर मध्ये सर्वसामान्यांसाठी सुरू करायचा असेल तर त्याचे काम त्याआधीच पूर्ण झाले पाहिजे. ऑक्टोबर वा नोव्हेंबरपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करावेत असा आमचा आग्रह आहे असे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान एमएसआरडीसीशी चर्चा करून या प्रकल्पाच्या उद्घाटनाची नवीन तारीख ठरवली जाईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. म्हणजेच डिसेंबर अखेरपर्यंत हा महामार्ग सुरु होण्याची दाट शक्यता आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!