अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- पोलीस ठाण्यातील मनमानी कारभार, पोलीस कर्मचार्यांसोबतची वर्तणूक व पोलीस ठाण्यात येणार्या नागरीकांच्या तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष आदी गोष्टींमुळे वादग्रस्त ठरलेले संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
तालुक्यातील एका गावातील मिसींग केसमधील संशयास्पद भुमिकेमुळे त्यांच्यावर बदलीची कारवाई झाली असल्याचे समजते. तालुक्यातील एका गावातील अंतरजातीय विवाहवरुन रात्री पोलीस ठाण्यात नाट्य घडले. या प्रकरणातील मुलगी बेपत्ता होती. याबाबत पोलीस ठाण्यात मिसींगची केस दाखल झालेली होती.
नंतर मुलगा आणि मुलीने लग्न केले. ते स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले. ते कायदेशीर सज्ञान असतांनाही पोलीस निरीक्षक पाटील यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत हे पोलीस ठाण्यात थांबले होते. पोलीस निरीक्षक पाटील त्यांना जावू देत नव्हते.
यानंतर काही राजकीय पदाधिकार्यांनी पाटील यांना संपर्क करुन या नवदांम्त्यास सोडून देण्यास सांगितले. तरीही ते ऐकायला तयार नव्हते. यानंतर मध्यरात्री हालचाली सुरु झाल्या. मध्यरात्री वरीष्ठ पोलिसांनी तातडीने पाटील यांची बदली करुन तात्पुरता पदभार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्याकडे सोपवला.
पाटील यांच्या बदलीचे आदेश निघाले असले तरी काही दिवस संगमनेरात थांबावे असे आदेश वरीष्ठ पोलीस अधिकार्यांनी त्यांना दिले असल्याचे समजते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved