EPFO New Rule : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असेल. नोकरी लागल्यानंतर सर्वात आधी आपण घराचेच स्वप्न पाहतो. पण घर खरेदी करणे ही काही सोपी बाब नाही. घरांच्या किमती अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे नोकरी लागल्यानंतर लगेचच तीन-चार वर्षात घर खरेदी करता येत नाही.
मात्र आता नोकरदारांचे घर खरेदीचे स्वप्न नोकरी लागल्यानंतर लगेचच पूर्ण होणार आहे. कारण की ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने कडून पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता घरासाठी डाऊन पेमेंट भरायचे असल्यास देखील पीएफ काढता येणार आहे.

यामुळे नोकरी लागल्यानंतर लवकरात लवकर घर बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण ईपीएफओचा हा नवा निर्णय नेमका कसा आहे? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कसा आहे ईपीएफओचा नवा निर्णय?
मिळालेल्या माहितीनुसार ईपीएफओने पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या लोकांसाठी नियमांमध्ये बदल केला आहे. नव्या नियमानुसार आता पीएफ खात्यातून घराच्या डाऊन पेमेंटसाठी 90% पर्यंतची रक्कम काढली जाऊ शकते. मात्र यासाठी एक अट देखील घालून देण्यात आली आहे.
तीन वर्षे जुने पीएफ अकाउंट असणाऱ्या लोकांनाच पीएफ मधून 90% पर्यंतची रक्कम काढता येणार आहे. नव्या नियमानुसार ईपीएफओ च्या सदस्यांना तीन वर्षे जुने पीएफ अकाउंट मधून 90% रक्कम काढता येणार आहे आणि ही रक्कम घराच्या डाउन पेमेंटसाठी, होम लोनच्या EMI भरण्यासाठी किंवा नवीन घर बांधण्यासाठी वापरता येणार आहे.
ईपीएफओ च्या या नव्या नियमाचा हाउसिंग सेक्टरला देखील मोठा फायदा होईल अशी आशा आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात घर खरेदी होईल आणि हाउसिंग सेक्टर देखील मजबूत होईल असे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान आता आपण ईपीएफओचा आधीचा नियम कसा होता याची माहिती पाहणार आहोत.
ईपीएफओचा आधीचा नियम काय सांगतो ?
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी EPFO कडून किमान पाच वर्ष जुने पीएफ अकाउंट असणाऱ्या ग्राहकांनाच ही सुविधा दिली जात होती. याशिवाय नव्या नियमानुसार 90% पर्यंतची रक्कम काढता येणे शक्य आहे मात्र जुन्या नियमानुसार 36 महिन्यांचे पीएफ अकाउंट मधील पीएफचे योगदान किंवा प्रॉपर्टीची किंमत यापैकी जे कमी असेल तेवढी रक्कम दिली जात होती.
एवढेच नाही तर जर एखादा ईपीएफओचा सदस्य हाउसिंग स्कीम मध्ये सहभागी असेल तर त्याला जुन्या नियमानुसार रक्कम काढता येत नव्हती. मात्र आता या नियमांमध्ये बदल झाला आहे, नवे नियम ईपीएफओ च्या सदस्यांसाठी अधिक फायद्याचे आहेत.