शिवकालीन किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळणे अभिमानास्पद ! मंत्री विखे पाटील यांचे गौरवोद्‌गार

Published on -

राहाता : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची देणाऱ्या राज्यातील १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळाल्याची ऐतिहासिक घटना संपूर्ण देशासाठी आणि शिवप्रेमींसाठी अभिमानास्पद असल्याचे मत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने सजलेले गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास आहे. हे किल्ले म्हणजे आपल्या संस्कृतीचे आणि परंपरेचे सजीव प्रतीक आहेत. आता जागतिक स्तरावर त्यांच्या ऐतिहासिक महत्वाची दखल घेत युनेस्कोने या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.”

या यादीत शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, साल्हेर, लोहगड, खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधूदुर्ग आणि जिंजी या बारा गडांचा समावेश
आहे. विखे पाटील यांनी सांगितले शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या सृजनशील इतिहासाचा जागतिक स्तरावर गौरव झाला आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे युनेस्कोमध्ये वीस देशांनी या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता देण्यासाठी मतदान केले, ही घटना संपूर्ण भारतासाठी गौरवाची आहे, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन, संरक्षण आणि पाविर्य जपण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योजना आखली आहे. या किल्ल्यांचे सांस्कृतिक महत्त्व कायम राखण्यासाठी शासनस्तरावरून सातत्याने उपाययोजना केल्या जात आहेत.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, “जागतिक वारसा स्थळ म्हणून या किल्ल्यांची नोंद होणे म्हणजे फक्त गौरव नव्हे, तर या किल्ल्यांचे संरक्षण, पावित्र्य आणि ऐतिहासिकतेचा आदर राखण्याची जबाबदारीही आता अधिक वाढली आहे.”

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!