‘तारक मेहता’तील जेठालालसाठी दिलीप जोशीपूर्वी ‘या’ 5 कॉमेडी स्टार्सला मिळाली होती ऑफर! नावे वाचून धक्का बसेल

Published on -

नुकत्याच आलेल्या एका मनोरंजक खुलाशाने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये पुन्हा एकदा चर्चेचं वादळ उठवलं आहे. गेली तब्बल 17 वर्षं घराघरात हास्याची कारंजी उधळणाऱ्या या मालिकेतील ‘जेठालाल’ हे पात्र म्हणजे आज प्रेक्षकांच्या मनात एक कायमचं स्थान निर्माण झालं आहे. दिलीप जोशी यांनी ही भूमिका इतकी प्रभावीपणे साकारली आहे की आज ती कोणत्याही दुसऱ्या चेहऱ्याशी जोडून पाहणं अशक्य वाटतं. पण गंमत म्हणजे सुरुवातीला ही भूमिका दिलीप जोशी यांच्यासाठी नव्हतीच!

राजपाल यादव

 

या मालिकेची सुरुवात होत असताना निर्मात्यांनी बऱ्याच मोठ्या विनोदी कलाकारांना ‘जेठालाल’साठी विचारलं होतं. आणि हे कलाकारही काही सामान्य नव्हते. बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावर आपली वेगळी छाप पाडणारे चेहरे होते. सगळ्यात आधी नाव घेतलं जातं ते राजपाल यादव यांचं. विनोदाच्या खास शैलीमुळे आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या राजपाल यादव यांनी एका मुलाखतीत कबूल केलं की त्यांना ‘जेठालाल’ची भूमिका ऑफर झाली होती. पण त्यावेळी त्यांनी टीव्ही नव्हे तर सिनेमांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि ही संधी नाकारली.

किकू शारदा

 

राजपालप्रमाणेच किकू शारदा यांचाही या यादीत समावेश होता. कपिल शर्माच्या विनोदी शोमधून ओळखीचा झालेला हा कलाकार दीर्घकालीन शो नको म्हणून ‘तारक मेहता’पासून दूर राहिला. त्याला लघु स्वरूपातील कॉमेडी अधिक प्रिय होती. त्याचप्रमाणे ‘हप्पू की उलटन पलटन’ मधून प्रसिद्ध झालेला योगेश त्रिपाठी यालाही ‘जेठालाल’साठी विचारण्यात आलं होतं. पण तो शो त्याच्या वाट्याला आला नाही आणि तो इन्स्पेक्टर हप्पू सिंगच्या भूमिकेतून लोकप्रिय झाला.

अली असगर आणि एहसान कुरेशी

याशिवाय अली असगर जो कपिलच्या शोमध्ये आजीची व्यक्तिरेखा साकारून खळखळून हसवत असे, त्यालाही या भूमिकेसाठी संपर्क करण्यात आला होता. मात्र त्यानेदेखील नकार दिला. शेवटी उरतो एहसान कुरेशी ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ मधून प्रसिद्ध झालेला विनोदी कलाकार. त्यालाही हीच भूमिका देण्याचा विचार होता.

दिलीप जोशी

या साऱ्यांनी नकार दिल्यानंतरच निर्मात्यांनी दिलीप जोशी यांच्याकडे लक्ष वळवलं. आणि जणू काही नियती याच क्षणाची वाट पाहत होती. दिलीप जोशी यांनी ‘जेठालाल’चा रोल असा काही साकारला की आज त्यांचं नाव घेतलं की त्यांची हसरी, रडवेली आणि रागीट चेहऱ्यांची मालिकाच आठवते. त्यांचं अभिनयगौरव इतकं ताकदीचं आहे की कोणालाही वाटत नाही की ही भूमिका आधी इतर कुणाला देण्याचा विचार केला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!