शेवगाव- गुरुपौर्णिमेनिमित्त वडुले खुर्द, ता. शेवगाव येथे आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात जेवणातून सुमारे ३० लहान मुलांना विषबाधा झाली होती; परंतू या मुलांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशीलकुमार बडे, आरोग्य सहाय्यक संभाजी आव्हाड यांनी वेळेत उपचार केल्याने पुढील अनर्थ टळला.
सरकारी डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला

प्राथमिक आरोग्य केंद, ढोरजळगाव शे. अंतर्गत वडुले खुर्द येथे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात रात्रीच्या अन्नातून ३० लहान मुलांना विषबाधा झाली होती.
या मुलांना ढोरजळगाव शे चे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोग्यसेवा दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशीलकुमार बडे, आरोग्य सहाय्यक संभाजी आव्हाड व ज्ञानेश्वर गोसावी, आरोग्य सहाय्यक डॉ. हेमांडे, आरोग्यसेवक श्रीम. पंडित व आरोग्य सेविकांनी उपस्थित राहून या सर्वांवर औषधोपचार केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.