अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :-शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे.
त्यामुळे येथील उत्पन्नही घटले आहे. परंतु याबाबत आता एक वृत्त समोर आले आहे. येथील कंत्राटी कामगारांचे तीन महिन्यापासून पगार थकवल्याने त्यांची उपासमार सुरु आहे.
दि.27 ऑक्टोंबर रोजी संस्थानच्या बैठकीत पगाराबाबत निर्णय घेण्यात घेण्यात येणार होता; मात्र सदरची बैठक रद्द झाल्याने पगाराची आस लावून बसलेल्या कामगारांचा अपेक्षाभंग झाला असून
ज्या कामगारांमुळे संस्थान प्रशासनाचा कारभार चालतो त्याच कामगारांना पगारासाठी संस्थानला बैठका घ्याव्या लागतात, ही आश्चर्याची बाब असून याप्रश्नी संस्थानच्या कामगार संघटना गप्प का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, दरम्यान, दर्शनासाठी साई मंदिर खुले करावे अशीमागणी अनेक संघटना करत आहेत. प्रशासनही याबाबतीत प्रयत्नशील असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणती दक्षता घ्यावी लागेल याचाही पुरेपूर अभ्यास या प्रशासनाने केला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved