तळेगाव दिघे- भोजापूर पूरचारी परिसरातील गावांना वर्षानुवर्षे जाणूनबुजून पाण्यापासून वंचित ठेवले गेले. निवडणूका जवळ आल्या की फक्त टँकरने चारीमध्ये पाणी आणून दाखवले जात होते. मात्र, आता भोजापूर चारीत टँकरने पाणी न टाकता तळेगाव, निमोण या दुष्काळी भागातील जनतेला त्यांच्या हक्काचे भोजापूर धरणातील ओव्हर फ्लोचे पाणी दिले जाईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे, निमोण दुष्काळी भागाला वरदान ठरणारे भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. भोजापूर धरणाच्या पाण्याचे आमदार अमोल खताळ यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी थेट धरणापासून जाणाऱ्या डाव्या कालव्यावरील पूरचारीची पाहणी केली. निमोण येथील तलावाचे जलपूजन केले.

याप्रसंगी शेतकरी नेते किसन – चत्तर, भाजपा अभियंता सेलचे – अध्यक्ष हरिश चकोर, निमोणचे सरपंच संदीप देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत गोमासे, महिला तालुकाध्यक्ष कविता पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ राहणे, राजेंद्र सोनवणे, प्रकाश सानप, तळेगावचे प्रभारी सरपंच मयूर दिघे, गणेश दिघे, युवक नेते अमोल दिघे, मारुती घुगे, नंदकुमार देशपांडे, तुकाराम घुगे, इंद्रभान घुगे, साहेबराव आंधळे, मिननाथ सानप, ऋषिकेश कांडेकर, गोकुळ गायकवाड, अर्जुन शिरसाट, भानुदास चत्तर, डॉ. संतोष डांगे, पंढरीनाथ इल्हे, उत्तम दिघे, सचिन गडाख, रावसाहेब गडाख, पुंजाहरी गडाख, अंकुश राहणे, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, उपअभियंता सुभाष पगारे, शाखा अभियंता शरद नागरे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रल्हाद शिंदे, जलसंधारण अधिकारी सुरेश मंडलिक, सनी पगार तसेच पूरचारीच्या लाभक्षेत्रातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते .
याप्रसंगी किसन चत्तर, श्रीकांत गोमासे, मारुती घुगे व साहेबराव आंधळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संदीप देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन संतोष घुगे यांनी केले. रविंद्र गाडेकर यांनी आभार मानले.