अहिल्यानगर बाजार समितीत गवारीला मिळाला १५ हजारापर्यंत भाव, २१२३ क्विंटल भाजीपाल्याची आवक, जाणून घ्या दर?

Published on -

अहिल्यानगर- नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी विविध भाजीपाल्याची २१२३ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ५५० क्विंटल बटाट्याची आवक झाली होती. यावेळी बटाट्याला ११०० ते २५०० रुपये भाव मिळाला. यावेळी टोमॅटोची ३९५ क्विंटल आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल ५०० ते २१०० रुपये भाव मिळाला.

वांग्याची २३ क्विंटल आवक झाली होती. यावेळी वांग्यांना २५०० ते ७००० रुपये भाव मिळाला. तर गवारीला प्रतिक्विंटल १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. बाजार समितीत पालेभाजांच्या २४ हजार ९११ जुड्यांची आवक झाली होती. दरम्यान, बाजार समितीत वांगे, दोडका, कारले वालाच्या शेंगांना चांगला भाव मिळत आहे.

अहिल्यानगर बाजार समितीत रविवारी काकडीची २३५ क्विंटल आवक झाली होती. काकडीला प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये भाव मिळाला. गवारीची ११ क्विंटल आवक झाली होती. गवारीला ३००० ते १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

फ्लॉवरची ७१ क्विंटल आवक झाली होती. फ्लॉवरला १००० ते ६००० रुपये भाव मिळाला. घोसाळ्याची ९ क्विंटल आवक झाली होती. घोसाळ्याला प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये भाव मिळाला. दोडक्याची ३३ क्विंटल आवक झाली होती. दोडक्याला २५०० ते ७५०० रुपये भाव मिळाला. कारल्याची ४२ क्विंटलवर आवक झाली होती. कारल्याला प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये भाव मिळाला.

कैरीची १० क्विंटलवर आवक झाली होती. कैरीला १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. भेंडीची ६१ क्विंटलवर आवक झाली होती. भेंडीला प्रतिक्विंटल १००० ते ५००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. कोबीची १४८ क्विंटल आवक झाली होती. कोबीला प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये भाव मिळाला. वालाची २ क्विंटलवर आवक झाली होती. वालाला ६००० ते १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. घेवड्याची ८ क्विंटल आवक झाली होती. घेवड्याला प्रतिक्विंटल ७ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

बिटाची ११ क्विंटल आवक झाली होती. बिटाला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये भाव मिळाला. वाटाण्याची १० क्विंटल आवक झाली होती. वाटाण्याला ८ हजार ते १२ हजार रुपये भाव मिळाला. डांगराची २ क्विंटल आवक झाली होती. डांगराला प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये भाव मिळाला. मका कणसाची ५३ क्विंटल आवक झाली होती. मका कणसाला प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये भाव मिळाला. शिमला मिरचीची ३७क्विंटल आवक झाली होती. शिमला मिरचीला ३००० ते ६००० रुपये भाव मिळाला.

दरम्यान, पालेभाजांच्या २४ हजार ९११ जुड्यांची आवक झाली होती. यामध्ये मेथीच्या ७ हजार १२८ जुड्यांची आवक झाली होती. मेथी जुडीला ४ ते १२ रुपयांपर्यंत भाव मिळाला. कोथिंबिरीच्या १४ हजार ४०४ जुड्यांची आवक झाली. कोथिंबिरीच्या जुडीला २ ते १० रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेपूच्या १९२७ जुड्यांची आवक झाली होती. यावेळी शेपू भाजीच्या जुडीला ४ ते ६ रुपयांपर्यंत भाव मिळाला. पालकच्या १३५१ जुड्यांची आवक झाली होती. पालक भाजीच्या जुडीला ६ रुपये भाव मिळाला.

गाजराला ३००० रुपयांपर्यंत भाव बाजार समितीत गाजराची २१ क्विंटल आवक झाली

होती. गाजराला प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. दुधी भोपळ्याची २८ क्विंटल आवक झाली होती. दुधीला १००० ते २५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला भुईमुगाच्या शेंगांची २३ क्विंटल आवक झाली होती. भुईमुग शेंगांना प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये भाव मिळाला. आद्रकची ५५ क्विंटल आवक झाली होती. आद्रकला २००० ते ३००० रुपये भाव मिळाला. चवळीची ४ क्विंटलवर आवक झाली होती. चवळीला ३००० ते ४००० रुपये भाव मिळाला.

शेवग्याला ६५०० रुपयांपर्यंत भाव अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत

रविवारी हिरव्या मिरचीची ८८ क्विंटलवर आवक झाली होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल ३००० ते ६००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. लसणाची ३० क्विंटल आवक झाली होती. लसणाला प्रतिक्विंटल ४००० ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवग्याची ९१ क्विंटलवर आवक झाली होती. शेवग्याला प्रतिक्विंटल ३००० ते ६ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. लिंबांची ३९ क्विंटल आवक झाली. लिंबाला प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!