गूगलमध्ये काम करणाऱ्या इंजिनियर्सला किती पगार मिळतो ? सॉफ्टवेअर की इलेक्ट्रिक कोणाला जास्त पगार ? वाचा सविस्तर

गुगलकडून आपल्या कर्मचाऱ्यांना किती पगार दिला जातो? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का ? मग आज आपण गुगल मधील इंजिनियर्सच्या पगाराबाबत माहिती पाहणार आहोत.

Published on -

Google Engineer Salary : इंजिनिअरिंगच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मल्टिनॅशनल कंपनीत इंजिनीयर म्हणून स्वप्न पाहणाऱ्या अवलिया तरुणांची संख्या आपल्याकडे फारच अधिक आहे. भारतातील विद्यार्थ्यांचा नेहमीच इंजीनियरिंग करण्याकडे कल असतो. मात्र अलीकडे मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी मिळवताना उमेदवारांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. खरे तर इंजीनियरिंग झाल्यानंतर गुगल सारख्या कंपनीत काम करण्याचे स्वप्न असते.

दरम्यान जर तुमचेही असेच स्वप्न असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. कारण की, google आपल्या इंजिनियर्सला किती पगार देते ? याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. खरे तर इतर मोठ्या कंपन्यांप्रमाणेच गुगल कंपनी देखील कर्मचाऱ्यांना किती पगार दिला जातो याबाबतची माहिती नेहमीच सिक्रेट ठेवते.

पण अलीकडेच google मधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदानुसार किती पगार मिळतो? याबाबतचा महत्त्वाचा तपशील समोर आला आहे. व्हिसा डेटामधून याबाबतचा तपशील समोर आला असून आज आपण गुगल मधल्या सॉफ्टवेअर इंजिनियर पासून ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरपर्यंत कोणाला किती पगार मिळतो याबाबतची डिटेल माहिती या लेखातून घेणार आहोत.

गुगलच्या इंजिनियर्सला किती पगार मिळतो?

सॉफ्टवेअर इंजिनिअर (Waymo) : या पदावरील कर्मचाऱ्यांना एक लाख 50 हजार डॉलर ते दोन लाख 82 हजार डॉलर इतक पॅकेज मिळत. 

रिसर्च इंजिनिअर : या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना गुगलकडून एक लाख 53 हजार डॉलर ते दोन लाख 65 हजार डॉलर इतक पॅकेज दिल जात. 

वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनिअर : या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना गुगल कंपनीकडून 1 लाख 87 हजार डॉलर ते दोन लाख 53 हजार डॉलर पर्यंतचे पॅकेज दिले जाते. 

सॉफ्टवेअर इंजिनिअर मॅनेजर : या पदावर नियुक्त कर्मचाऱ्यांना एक लाख 99 हजार डॉलर ते तीन लाख 16 हजार डॉलर पर्यंतचे पॅकेज मिळते. 

स्टाफ सॉफ्टवेअर इंजिनिअर : या पदावर नियुक्त कर्मचाऱ्यांना गुगलकडून 2 लाख 20 हजार डॉलर ते तीन लाख 23 हजार डॉलर पर्यंतचे पॅकेज दिले जाते. 

अॅप्लिकेशन इंजिनिअर : या पदावर नियुक्त कर्मचाऱ्यांना google कडून एक लाख 38 हजार डॉलर ते एक लाख 99 हजार डॉलर इतके पॅकेज दिले जाते. 

सिलिकॉन जनरलिस्ट : या पदावर नियुक्त कर्मचाऱ्यांना गुगलकडून एक लाख 44 हजार डॉलर ते 2 लाख 23 हजार डॉलर इतके पॅकेज दिले जाते. 

सिलिकॉन इंजिनिअर : या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना 1 लाख 46000 डॉलर ते दोन लाख 52 हजार इतकं पॅकेज दिलं जातं. 

नेटवर्क इंजिनिअर : या पदावर नियुक्त कर्मचाऱ्यांना गुगलकडून एक लाखात हजार डॉलर ते एक लाख 95 हजार डॉलर पर्यंत चे पॅकेज दिले जाते. 

सॉफ्टवेअर इंजिनिअर : या पदावर नियुक्त कर्मचाऱ्यांना गुगलकडून एक लाख 90180 डॉलर ते तीन लाख 40 हजार डॉलर पर्यंतचे पॅकेज दिले जाते. सॉफ्टवेअर इंजिनियरला गुगल कंपनीकडून सर्वाधिक पगार दिला जात असल्याचा दावा देखील केला जातो.

डेटा इंजिनिअर : या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक लाख 11 हजार डॉलर ते एक लाख 75 हजार डॉलर पर्यंतचे पॅकेज दिले जाते. 

इलेक्ट्रिकल इंजिनिअर : या पदावर काम करणाऱ्यांना 1 लाख 19 हजार डॉलर ते दोन लाख तीन हजार डॉलर पर्यंतचे पॅकेज दिले जाते.

सिलिकॉन डिझाइन व्हेरिफिकेशन इंजिनिअर : या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक लाख 26 हजार डॉलर ते 2 लाख 7 हजार 50 डॉलर इतके पॅकेज दिले जात आहे. 

हार्डवेअर इंजिनिअर : या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक लाख तीस हजार डॉलर ते दोन लाख 84 हजार डॉलर इतके पॅकेज मिळते. 

सॉफ्टवेअर इंजिनिअर, साइट रिलायबिलीटी इंजिनिअर : या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक लाख 33 हजार डॉलर ते दोन लाख 58 हजार डॉलर इतके पॅकेज मिळते. 

कस्टमर इंजिनिअर : या पदावर नियुक्त कर्मचाऱ्यांना 85 हजार 9 डॉलर ते दोन लाख 28 हजार डॉलर पर्यंतचे पॅकेज दिले जाते. 

सेक्युरिटी इंजिनिअर : या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 97 हजार डॉलर ते 2 लाख 33 हजार डॉलर पर्यंतचे पॅकेज दिले जाते.

कस्टमर इंजिनिअर अभियंता : या पदावर नियुक्त कर्मचाऱ्याला गुगलकडून 1 लाख 8 हजार डॉलर ते दोन लाख 28 हजार डॉलर पर्यंतचे पॅकेज दिले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!