श्रावण महिना म्हणजे भक्तिभावाने ओसंडून वाहणारा, भोलेनाथाच्या कृपेसाठी आराधनेने गजर करणारा कालखंड. पण यंदाचा श्रावण काहीसा खास आहे. कारण तब्बल 70 वर्षांनंतर असा दुर्मीळ योग तयार झाला आहे, ज्यामध्ये 4 महत्त्वाचे ग्रह शनि, राहू, केतू आणि बुध एकाचवेळी उलट्या दिशेने म्हणजे वक्री चाल करू लागले आहेत.

भारतीय ज्योतिषशास्त्रात अशा वक्री गतीला फार महत्त्व दिलं जातं, कारण अशा वेळी काही राशींवर विशेष प्रभाव पडतो. यंदा अशा 4 राशी आहेत, ज्या या वक्री गतीच्या काळात भोलेनाथाच्या कृपेने अक्षरशः नशिबवान ठरू शकतात.
यंदाच्या श्रावणात शनि मीन राशीत वक्री अवस्थेत आहे आणि ही स्थिती 28 नोव्हेंबरपर्यंत चालेल. बुधदेखील कर्क राशीत वक्री होईल व 11 ऑगस्टनंतर थेट होईल. राहू आणि केतू हे ग्रह नेहमीच वक्री गतीत असतात. सध्या राहू कुंभ राशीत तर केतू सिंह राशीत आहे. या सगळ्याचा एकत्र परिणाम काही निवडक राशींवर अतिशय सकारात्मक घडणार आहे.
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांना या काळात व्यवसायात नफा, नोकरीत संधी आणि घरात समाधानाचा अनुभव येईल. आर्थिक स्थैर्य मिळेल आणि दीर्घ काळ अडकलेले पैसेही मिळण्याची शक्यता असेल. घरात मंगलमय वातावरण राहील, व काहींना नवीन कामांची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते.
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठी ही वक्री गती आयुष्यात नवा बदल घेऊन येणार आहे. शिवकृपेने त्यांना आर्थिक लाभ, नातेसंबंधात गोडवा आणि करिअरमध्ये उंच भरारी मिळू शकते. खास करून विवाहित लोकांसाठी हा काळ प्रेमळ ठरेल, तर नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना त्यांच्या आयुष्यातील अनेक इच्छा पूर्ण करणारा ठरेल. घर किंवा वाहन खरेदी करण्याचा योग तयार होतोय. कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल, वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल, आणि मेहनतीला योग्य फळ मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ घसघशीत लाभ देणारा असेल.
मीन राशी
मीन राशीचे लोक सुद्धा या वक्री ग्रहांच्या प्रभावामुळे अनेक अडचणींपासून मुक्त होऊ शकतात. जुने गुंते सुटतील, नात्यांमध्ये सामंजस्य निर्माण होईल आणि वैयक्तिक जीवनात आनंददायक क्षण अनुभवता येतील. काही मीन राशीचे लोक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात किंवा जुना व्यवसाय नफा देऊ लागेल.