राहता- मतदारसंघ वेगळा असला, तरी लोकहितासाठी विखे कुटुंब विकासकामात कोणताही भेदभाव करत नाही. गरजेनुसार आणि जनतेच्या हितासाठी सार्वजनिक कामांना नेहमीच प्राधान्य दिले आहे आणि जीवात जीव असेपर्यंत हे कार्य अविरत सुरूच राहील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राहाता तालुक्यातील वाकडी येथे आयोजित एका कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहाता बाजार समितीच्या संचालिका रंजनाताई बापूसाहेब लहारे होत्या. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, शासनाचा निधी वारंवार एका कामासाठी मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक काम गुणवत्ता आणि पारदर्शकतेने पूर्ण झाले पाहिजे. त्यांनी ठेकेदारांना योग्य पद्धतीने
कामे पार पाडण्याच्या सूचना दिल्या.

त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य दवाखान्याची पाहणी करून त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. निधी प्राप्त झाल्यास नवीन भव्य प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
वाकडी गावासाठी मंजूर झालेली २७ कोटी रुपयांची जलजीवन योजना ही गावाच्या पाणीप्रश्नासाठी महत्त्वाची असून, या योजनेत वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता योग्य आहे की नाही, हे स्थानिक लोकप्रतिनिधींनी तपासले पाहिजे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहारे, राहाता बाजार समितीचे माजी संचालक बापूसाहेब लहारे, विवेक गुंड, गटविकास अधिकारी मयूर मुनोत, ग्रामविकास अधिकारी मडके, तलाठी निलेश वाघ, जि.प. सदस्या कविताताई लहारे, प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच रोहिणीताई आहेर, आरपीआयचे महाराष्ट्र राज्य सचिव राजाभाऊ कापसे, डॉ. स्वाती बच्छाव, विकीभाऊ कापसे, डॉ. संपतराव शेळके, अॅड. भाऊसाहेब शेळके, सुरेश जाधव, अभय शेळके, संदिप लहारे, अमित आहेर, शोभाताई घोरपडे, अण्णासाहेब कोते, अनिल कोते, रमेश लहारे, सुनीता कासार, ज्योतीताई लहारे, जान्हवी कोते, प्रियंका जाधव, त्रिवेणी कोते, अनिताताई कापसे, गंगाधर नारंगिरे, संदीपानंद लहारे, गोरक्षनाथ कोते, बाबासाहेब शेळके, पोपट लहारे, जालिंदर लांडे, सुनील कुरकुटे, मच्छिद्र अभंग, गोरक्षनाथ साबदे, बाळासाहेब आहेर, भीमाशंकर लोखंडे, साहेबराव आदमाने यांच्यासह गावातील अनेक महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पोपट लहारे यांनी केले.