मोठ्या रॅमसह दमदार परफॉर्मन्स देणारे स्मार्टफोन म्हटले, की आपल्याला लगेच वाटते की यासाठी 10 हजारांहून अधिक खर्च करावा लागेल. पण आता हे समीकरण बदलत आहे. कारण आयटेलने भारतीय ग्राहकांसाठी एक असा स्मार्टफोन बाजारात आणला आहे, जो किमतीत परवडणारा आहेच, पण त्याच्या फीचर्सच्या बाबतीतही कोणत्याही मोठ्या ब्रँडच्या फोनला टक्कर देणारा आहे. आणि त्याचं सगळ्यात लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे, त्याची iPhone सारखी डिझाईन.

आयटेल A90
आयटेल A90 या फोनची किंमत फ्लिपकार्टवर फक्त ₹6,549 इतकी आहे. ही किंमत पाहून तुम्हाला वाटेल की या फोनमध्ये फार काही मिळणार नाही. पण आश्चर्य म्हणजे, या फोनमध्ये 4GB रॅमसह 64GB इंटरनल स्टोरेज आहे. याच्या वर, ‘डायनॅमिक मेमरी एक्सपेंशन’ तंत्रज्ञानामुळे याला 8GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम मिळते, म्हणजे एकूण रॅम होते तब्बल 12GB. ही सुविधा याआधी फक्त महागड्या स्मार्टफोनमध्ये दिसायची.
हा फोन Unisoc T606 प्रोसेसरवर चालतो, जो सामान्य वापरासाठी अत्यंत स्थिर आणि कार्यक्षम आहे. सोशल मीडिया, व्हिडीओ स्ट्रिमिंग, हलकाफुलका गेमिंग हे सर्व या फोनवर सहज करता येते. स्टोरेजच्या बाबतीतही, 128GB पर्यंत एक्सपँड करण्याची सुविधा यात आहे.
फीचर्स आणि कॅमेरा
A90 मध्ये 6.6 इंचांचा HD+ डिस्प्ले आहे, जो डायनॅमिक बारसह येतो. याचा 90Hz रिफ्रेश रेट स्क्रीन अनुभवाला अधिक स्मूथ बनवतो.फोनमध्ये मागील बाजूला 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश आहे. पुढील बाजूला 5 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा दिला आहे. अतिशय प्रोफेशनल फोटोग्राफी भलेही शक्य नसेल, पण दररोजच्या वापरासाठी, सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्यासाठी हा कॅमेरा पुरेसा आहे.
बॅटरी आणि चार्जिंग
हा फोन 5000 mAh बॅटरीसह येतो, जी एकदा चार्ज केल्यावर सहज 1 दिवस टिकते. त्यात 15W फास्ट चार्जिंग सपोर्टदेखील आहे, त्यामुळे कमी वेळात फोन पुन्हा वापरण्यासाठी सज्ज होतो.
फोन अँड्रॉइड 14 Go एडिशनवर आधारित असून, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. यामुळे बायोमेट्रिक सिक्युरिटीही मिळते. शिवाय, IP54 डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट रेटिंगमुळे हा फोन दैनंदिन धूळ-माती आणि थोड्याशा पाण्याच्या संपर्कात टिकून राहतो.
ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ac, Bluetooth 5, GPS आणि USB Type-C सारखे सर्व महत्त्वाचे कनेक्टिव्हिटी पर्याय या फोनमध्ये आहेत.