अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, सांगली, सातारा, सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी ! वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार

तुम्हीही रेल्वेने प्रवास करता का ? मग तुमच्यासाठी मध्य रेल्वेकडून एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वे महाराष्ट्रातुन चार नव्या वंदे भारत ट्रेन सुरू करणार आहे.

Published on -

Vande Bharat Train : राज्यातील अहिल्यानगर संभाजीनगर जालना सांगली सातारा सोलापूर पुणे शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील वंदे भारत एक्सप्रेस चे नेटवर्क आणखी मजबूत होणार आहे. कारण की महाराष्ट्रात आणखी चार वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. सध्या महाराष्ट्रातून एकूण 11 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.

राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते शिर्डी सीएसएमटी ते जालना सीएसएमटी ते मडगाव मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद मुंबई सेंट्रल ते गांधीनगर नागपूर ते बिलासपुर नागपूर ते इंदोर नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर सध्या वंदे भारत ट्रेन सुरू आहे. दरम्यान आता राज्यातून आणखी चार वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत.

या मार्गांवर धावणार वंदे भारत ट्रेन 

मिळालेल्या माहितीनुसार आगामी चारही वंदे भारत एक्सप्रेस पुणे रेल्वे स्थानकावरून धावणार आहेत. मध्य रेल्वे कडून पुणे ते बेळगाव, पुणे ते वडोदरा, पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते शेगाव या चार मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवली जाणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली आहे. यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान आणि सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

पुणे – सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस : ही गाडी दौंड, सोलापूर आणि गुलबर्गा या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. येत्या काही महिन्यांनी ही गाडी प्रत्यक्षात रुळावर धावण्याची शक्यता आहे.

पुणे – वडोदरा वंदे भारत एक्सप्रेस : या गाडीमुळे पुणे ते वडोदरा दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे. ही गाडी लोणावळा, पनवेल, वापी आणि सुरत या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा येणार अशी माहिती हाती आली आहे.

पुणे – शेगाव वंदे भारत एक्सप्रेस : पुण्यातून शेगाव ला जाणाऱ्या भाविकांची संख्या फारच उल्लेखनीय आहे तसेच शेगाव मधून पुण्यात येणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे आणि याच अनुषंगाने पुणे ते शेगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ही हाय स्पीड ट्रेन चालवली जाणार आहे.

महत्वाची बाब म्हणजे या गाडीला अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणारा आहे. दौंड, अहिल्यानगर, संभाजीनगर आणि जालना या महत्त्वाच्या स्थानकावर ही गाडी थांबणार आहे.

पुणे – बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस : या गाडीमुळे या दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास कालावधी दोन ते तीन तासांनी कमी होणार आहे. या गाडीला सातारा, सांगली आणि मिरज या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा दिला जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News