जगात फक्त एका महिलेच्या शरीरात सापडला ‘हा’ अत्यंत दुर्मीळ रक्तगट, शास्त्रज्ञही चकित!

Published on -

आपण A+, B+, AB-, O- असे अनेक रक्तगट ऐकले आहेत. परंतु एक असा रक्तगट आहे, जो संपूर्ण जगभरात केवळ एका महिलेमध्येच आढळला आहे. ‘ग्वाडा निगेटिव्ह’ नावाचा हा रक्तगट इतका दुर्मिळ आहे की त्याचं अस्तित्वच अनेक वर्षांपर्यंत गूढ होतं. वैज्ञानिकांनाही याचा शोध लावायला तब्बल 14 वर्ष लागले. आज आपण या रक्तगटाची कहाणी, त्यामागील शास्त्रीय गुंतागुंत आणि त्याची वैशिष्ट्ये समजून घेणार आहोत.

सर्वप्रथम 2011 मध्ये फ्रान्समधील एका 68 वर्षीय महिलेला सामान्य शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या रक्ताच्या तपासणीत शास्त्रज्ञांना एक अनपेक्षित अडथळा आढळला. तिच्या रक्तात एक अशी अँटीबॉडी होती, जी जगातील कोणत्याही ज्ञात रक्तगटाशी जुळत नव्हती. या संशयातूनच पुढे एक नवा संशोधनप्रवास सुरू झाला.

ईएमएम अँटीजेनचा अभाव

‘ग्वाडा निगेटिव्ह’ रक्तगटाचा मुख्य विशेष म्हणजे त्यामध्ये EMM (ईएमएम) अँटीजेनचा पूर्णतः अभाव असतो. साधारणतः सर्व सामान्य रक्तगटांच्या लाल रक्तपेशींमध्ये हा अँटीजेन असतो. पण या महिलेमध्ये तो आढळून आला नाही, त्यामुळे तिच्या शरीराने इतर कोणत्याही रक्तगटाला स्वीकारण्यास नकार दिला. ही एक अत्यंत धोकादायक स्थिती होती, कारण तिला जीवनात कधी रक्ताची गरज भासली, तर ती कुठल्याही सामान्य डोनरकडून रक्त घेऊ शकणार नव्हती.

2011 पासून ही बाब गुप्त संशोधनाचा विषय होती. अखेर 2025 मध्ये ISBT (International Society of Blood Transfusion) ने Guadeloupe Negative Blood Groupला अधिकृत मान्यता दिली आणि जगातील 48वा रक्तगट म्हणून त्याची नोंद झाली. हे नाव फ्रान्सच्या ग्वाडालूप बेटांवरून ठेवण्यात आले कारण ही महिला तिथली रहिवासी आहे.

हा रक्तगट इतका दुर्मिळ का?

‘ग्वाडा निगेटिव्ह’ रक्तगट इतका दुर्मिळ आहे की, तो फक्त एकाच व्यक्तीमध्ये आढळला आहे. जगात अशा काही रक्तगटांपैकी हा एक आहे, ज्याची जोडीदार किंवा डोनर अजून मिळालेला नाही. त्यामुळे अशा रुग्णांच्या आरोग्यासाठी भविष्यकाळात मोठे आव्हान आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!