लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. खासकरून मुलींसाठी तर तो नव्या आयुष्याची सुरुवात असते. आपल्या पतीसोबत प्रेम, समजूतदारपणा आणि आर्थिक स्थैर्य लाभावं, असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. काही मुलींच्या कुंडलीत असे अद्वितीय योग असतात, जे त्यांचं लग्न केवळ एक नातं न राहता, राजेशाही अनुभव बनवतात. त्यांच्या नशिबात असा पती लिहून आलेला असतो, जो केवळ श्रीमंतच नसतो, तर प्रेमळ, समजूतदार आणि त्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण घेऊन येणारा असतो. ज्योतिषशास्त्रात याला श्रीमंत पती योग असं म्हटलं जातं आणि यामागे काही विशिष्ट ग्रहयोग असतात, जे स्त्रीच्या कुंडलीत अत्यंत शुभ मानले जातात.

‘शश योग’
ज्योतिषशास्त्रात ‘शश योग’ हा एक अत्यंत प्रभावी आणि धनदायक योग मानला जातो. हा योग शनी ग्रहामुळे तयार होतो. जर शनी मकर, कुंभ किंवा तुळ राशीत असतो आणि तो केंद्रस्थानी म्हणजे 1, 4, 7 किंवा 10व्या घरात स्थित असेल, तर अशा कुंडलीत शश योग निर्माण होतो. या योगामुळे स्त्रीच्या वैवाहिक जीवनात स्थिरता येते, पतीचे आर्थिक स्थर चांगले असते आणि तिचे आयुष्य भौतिकदृष्ट्या समृद्ध होतं. अशा महिलांना आयुष्यात हव्या त्या सुखसोयी सहज मिळतात. मोठं घर, आलिशान गाडी, स्थिर संपत्ती आणि प्रेमळ जोडीदार.
‘मालव्य योग’
यासोबतच ‘मालव्य योग’ देखील अशाच प्रकारचा एक शुभ योग आहे, जो शुक्र ग्रहामुळे तयार होतो. जर शुक्र वृषभ, तूळ किंवा मीन राशीत असेल आणि तो केंद्रस्थानी स्थित असेल, तर तो मालव्य योग बनवतो. या योगामुळे स्त्रीचे आयुष्य केवळ प्रेमळच नव्हे, तर ऐहिक सुखांनी भरलेलं असतं. पती श्रीमंत, आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा आणि स्त्रीच्या प्रत्येक गरजेची काळजी घेणारा असतो.
‘लक्ष्मी योग’
अशा कुंडल्या फक्त पतीच्या संपत्तीची हमी देत नाहीत, तर त्या नात्यात प्रेम, समजूतदारपणा आणि आदरही टिकवून ठेवतात. ‘लक्ष्मी योग’ ही अशीच एक स्थिती आहे जिथे गुरू आणि शुक्र ग्रहांची अनुकूल स्थिती दुसऱ्या (धन) आणि अकराव्या (लाभ) भावात असेल, तर त्या महिलेला धन, सौख्य आणि पतीकडून भरभरून प्रेम मिळतं.
जर स्त्रीच्या कुंडलीत सातवा भाव आणि लग्नाचा स्वामी शुभ ग्रहांशी संबंधित असेल, तर त्या स्त्रीच्या पतीचा व्यवसाय, सामाजिक स्थान आणि आर्थिक साक्षरता खूप चांगली असते. गुरू जर सातव्या घरात असेल किंवा त्यावर दृष्टी टाकत असेल, तर अशा पतीला ज्ञानी, उदार आणि मोठ्या मनाचा मानलं जातं. बुध जर या घरात प्रभाव टाकत असेल, तर पती हुशार, व्यवहारकुशल आणि यशस्वी व्यापारी असतो.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या प्रकारच्या कुंडली असलेल्या महिलांच्या नशिबात अशा पतीचा साथ असतो जो आयुष्यभर त्यांचं मन जिंकतो, त्यांना राणीप्रमाणे वागवतो. पती केवळ कर्तृत्ववानच नव्हे, तर त्यांच्या आयुष्यात सौख्य, समाधान आणि आनंद घेऊन येतो.