India’s Top Malls : शॉपिंग हा आपल्यापैकी अनेकांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय. भारतात शॉपिंग साठी आपल्याला वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतात. स्ट्रीट शॉपिंग पासून ते मोठमोठ्या मॉल्स पर्यंत इथे सार काही अवेलेबल आहे.
पारंपारिक हस्तकलेपासून ते उच्च दर्जाच्या लक्झरी ब्रँडपर्यंत सर्वकाही आपल्याला इथं मिळत. आपल्या देशात आवडीनुसार आणि बजेटनुसार बाजारपेठा, मॉल्स आणि शॉपिंग स्ट्रीट्सची अविश्वसनीय विविधता पाहायला मिळते.

पण तुम्हाला भारतातील टॉप पाच मॉल्स कोणते याची माहिती आहे का? नाही ना मग आज आपण याचीच माहिती पाहणार आहोत. भारतातील सर्वात मोठे टॉप पाच मॉल्स कोणते आणि यात महाराष्ट्रातील किती मॉल समाविष्ट आहेत याची माहिती आता आपण घेऊयात.
लुलू मॉल, कोची : भारतातील सर्वात मोठ्या टॉप पाच मॉल्सच्या यादीत कोची येथील लुलू मॉल हा पाचव्या क्रमांकावर येतो. या मॉलचे एकूण क्षेत्रफळ 1.8 दशलक्ष चौरस फूट इतके आहे. या मॉलमध्ये तुम्हाला विविध जागतिक ब्रँड, एक हायपरमार्केट, एक मल्टिप्लेक्स आणि एक इनडोअर अॅम्युझमेंट पार्क सुद्धा पाहायला मिळणार आहे. यामुळे दक्षिण भारतात जाणाऱ्या पर्यटकांमध्ये आणि येथील नागरिकांमध्ये हा मॉल फारच लोकप्रिय आहे. संपूर्ण दक्षिण भारतातील लोक या मॉलला भेट देत असतात.
फिनिक्स मार्केटसिटी, पुणे : देशातील सर्वाधिक मोठ्या टॉप पाच मॉलमध्ये महाराष्ट्रातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यातील फिनिक्स मार्केटसिटी मॉलचाही नंबर लागतो. हा शॉपिंग मॉल या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या मॉलचे एकूण क्षेत्रफळ 1.9 दशलक्ष चौरस फुटांपेक्षा जास्त आहे.
या शॉपिंग सेंटरमध्ये विविध ब्रँडची दुकाने आणि मोठे फूड कोर्ट तर आहेतच शिवाय येथे येणाऱ्या लोकांना फिशिंग, आर्केड आणि चित्रपट असे मनोरंजनाचे ठिकाण सुद्धा येथे आहे. हा मॉल लक्झरी सोबतच बजेट फ्रेंडली शॉपिंग साठी प्रसिद्ध आहे.
फिनिक्स मार्केटसिटी, मुंबई : देशातील सर्वात मोठ्या मॉल मध्ये देशाच्या आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईतील सर्वात मोठा मॉल, फिनिक्स मार्केटसिटीचा सुद्धा समावेश होतो. या मॉलचा या यादीत तिसरा नंबर लागतो. या मॉल चे एकूण क्षेत्रफळ 2.1 दशलक्ष चौरस फूट इतके आहे.
यात तुम्हाला वेगवेगळी फॅशन ब्रँडची स्टायलिश दुकाने, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची दुकाने दिसतील. मनोरंजनासाठी देखील इथे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. या मॉलला भेट देण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याचे अद्भुत रेस्टॉरंट्स आणि उत्कृष्ट नाईटक्लब, जे ते खरेदी आणि विश्रांतीसाठी एक उत्कृष्ट ठिकाण ठरते.
डीएलएफ मॉल ऑफ इंडिया, नोएडा : देशातील सर्वात मोठे टॉप 5 मॉल्समध्ये नोएडाच्या डीएलएफ मॉल ऑफ इंडियाचा सुद्धा नंबर लागतो. हा देशातील दुसरा सगळ्यात मोठा मॉल आहे. या मॉल चे एकूण क्षेत्रफळ हे 20 लाख चौरस फूट इतके असू शकते.
या मॉलमध्ये 350 च्या सुमारास विविध ब्रँड, एक मोठे फूड कोर्ट आणि विविध मनोरंजन पर्याय आहेत, ज्यात गेमिंग झोन आणि मल्टिप्लेक्सचा समावेश आहे. या ठिकाणी तुम्हाला एक वेगळाच शॉपिंग एक्सपिरीयन्स मिळणार आहे.
लुलू मॉल, तिरुवनंतपुरम : केरळमधील तिरुवनंतपुरम मध्ये स्थित असणारे लुलु मॉल हा भारतातील सर्वात मोठा मॉल म्हणून ओळखला जातो. हा 25 लाख चौरस फुट क्षेत्रफळ असणारा मॉल देशातील सर्वात मोठा मॉल आहे. शॉपिंग करणाऱ्या लोकांसाठी हे ठिकाण एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही.
या मॉलमध्ये तुम्हाला वेगवेगळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत ब्रँड, एक भव्य फूड कोर्ट आणि एक विस्तृत मनोरंजन क्षेत्र पाहायला मिळणार आहे. यात एक मल्टिप्लेक्स सिनेमा आणि एक इनडोअर मनोरंजन पार्क देखील आहे, ज्यामुळे हा मॉल शॉपिंग साठी सोबतच मनोरंजनासाठी एक बेस्ट पर्याय ठरतो. यामुळे जर तुम्ही कधी केरळला गेलात तर येथे भेट द्यायला विसरू नका.