महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमधून धावणार नवीन रेल्वेगाडी ! 20 जुलैपासून सुरु होईल, राज्यातील कोण-कोणत्या स्थानकावर थांबा ? पहा…

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. उद्यापासून अर्थातच 20 जुलै 2025 पासून ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

Published on -

Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. 20 जुलै 2025 पासून रेल्वे प्रशासनाकडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की रेल्वे प्रशासनाने काचीगुडा ते भगत कि कोठी यादरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलेला होता.

या विशेष एक्सप्रेस ट्रेनमुळे उत्तर आणि दक्षिण भारताला एक चांगली रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली होती. दरम्यान आता रेल्वे प्रशासनाकडून हिच विशेष गाडी नियमित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 20 जुलै 2025 पासून काचीगुडा ते भगत की कोठी यादरम्यान नियमित गाडी सुरू होणार आहे.

ही गाडी या मार्गावरील अनेक प्रमुख धार्मिक स्थळांना आणि तीर्थक्षेत्रांना जोडते यामुळे या गाडीचा या मार्गावरील सर्वसामान्य प्रवाशांना तसेच भाविकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास जाणकारांकडून व्यक्त होतोय.

खरंतर अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी ही गाडी नियमित स्वरूपात सुरू करावी अशी मागणी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती. यानुसार खासदार धोत्रे यांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेत रेल्वे मंत्रालयाकडून ही गाडी नियमित करण्यात आली आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा झेंडा प्राप्त झाल्यानंतर आता उद्यापासून म्हणजेच 20 जुलै 2025 पासून ही गाडी नियमित स्वरूपात धावणार आहे आणि आज आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कुठे कुठे थांबा घेणार याची डिटेल माहिती आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.  

कस राहील वेळापत्रक?

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार काचीगुडा – भगत की कोठी नवीन एक्सप्रेस ट्रेन (गाडी क्रमांक 17605) 20 जुलै 2025 पासून दररोज सोडली जाणार आहे. ही गाडी काचीगुडा येथून 23.50 वाजता सोडली जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी 20.00 वाजता भगत कि कोठी येथे पोहोचणार आहे.

तसेच भगत की कोठी – काचीगुडा एक्सप्रेस ट्रेन (गाडी क्रमांक 17606) 22 जुलै 2025 पासून तर रोज भगत की कोठी रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. ही गाडी या रेल्वेस्थानकावरून दररोज 22.30 वाजता सोडली जाईल आणि तिसऱ्या दिवशी 15.40 वाजता काचीगुडा येथे पोहोचणार आहे. 

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?

या नव्या रेल्वे गाडीला या मार्गावरील निजामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, नर्मदापूरम, राणी कमलापती, संत हिरदाराम नगर, सिहोर, मक्सी, उज्जैन, रतलाम, जावोरा, मंदसोर,

निमच, चितोरगढ, भिलवारा, बिजाईनगर, नसिराबाद, अजमेर, ब्यावर, सोजत रोड, मारवार, पाली मारवार या रेल्वेस्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!