अहिल्यानगर- शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचे दिसल्याने औषध व्यवस्थित का मारले नाही, असे विचारल्याच्या रागातून तिघांनी त्याच्या कोयत्याने हल्ला केला. ही घटना १७ जुलै रोजी सकाळी घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नवनाथ सूर्यभान नाटक, गीताराम सूर्यभान नाटक व अन्य दोघांचा संशयित आरोपीमध्ये समावेश आहे.
याबाबत भानुदास सूर्यभान नाटक (वय ४५, रा. शहापूर, ता. जि. अहल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, १७ जुलै रोजी शेतात गेलो असता सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचे दिसले.

त्यावर नवनाथ नाटक याला म्हणालो की, औषध व्यवस्थीत का मारले नाही माझ्या सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. असे म्हणाल्याचा राग आल्याने त्यांनी कोयत्याने डोक्यात वार करून गंभीर दुखापत केली. लोखंडी रॉडने हातापायावर मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक फौजदार बी. बी. अकोलकर गुन्ह्याचा तपास करीत आहेत.