अहिल्यानगर- सध्या राज्यात भाषांवरून राजकारण पेटलेले असताना पेमराज सारडा महाविद्यालयात संस्कृत, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे अनोखे एकत्रीकरण करत भाषा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील ११ वी व १२ वी मधील विद्यार्थी महोत्सवात सहभागी होत चारही भाषांच्या विविध पैलूंची ओळख करून घेतली.
यानिमित्त सभागृहात चारही भाषांच्या भित्तीपत्रकांचे छोटेसे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व भाषा कशा एक आहेत हा संदेश देणारी लघु नाटिकाही विद्यार्थिनींनी सादर केली. तसेच वृत्तपत्र, रेडीओ या माध्यमांच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांनी सजलेला हा भाषा महोत्सव शेवटपर्यंत रंगतच गेला.

भाषा महोत्सवाचे उद्घाटन निवेदिका वीणा दिघे व ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास संस्थेचे मार्गदर्शक अजित बोरा, महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. पारस कोठारी,
संचालिका प्रा. ज्योती कुलकर्णी, प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित, उपप्राचार्य गिरीश पाखरे, पर्यवेक्षक सुजित कुमावत, प्रबंधक अशोक असेरी आदींसह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविकात पर्यावेक्षक प्रा. महेश कुलकर्णी यांनी महोत्सवा मागची संकल्पना व्यक्त केली. प्रा. गोपीनाथ होले व चंद्रकला जाधव यांनी परिचय दिला. प्रा. अर्चना कुलकर्णी यांनी आभार मानले. भाषा महोत्सवाचे आयोजन प्रा. अतुल कुलकर्णी, संस्कृत विभागाच्या भावना वैकर, मराठी विभागाच्या प्रा. डॉ. स्मिता भुसे, प्रा. डॉ. राजु रीक्कल, हिंदी विभागाचे बाबा गोसावी, प्रा. वैशाली सामल, प्रा. ज्योती वाकडे, इंग्रजी विभागाचे प्रा. प्रसाद बेडेकर आदींनी केले.