राहुरी शहर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांचा विरोध करणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर सरकारने गुंड पाठवून भ्याड हल्ला केला, असा आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, सरकारने कितीही गुंड सोडले तरी आम्ही आमचे पुरोगामी विचार सोडणार नाही.
शुक्रवारी दुपारी राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारात या हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सभेनंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन सादर करण्यात आले.

तनपुरे म्हणाले की, प्रवीण गायकवाड यांनी परदेशात हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. हल्ला करणारा भाजपाचा कार्यकर्ता असून, तो खुनाच्या गुन्ह्यातील गुंड प्रवृत्तीचा आहे. हे सरकार अशा गुंडांना राजाश्रय देत आहे. राज्यात हुकूमशाही पद्धतीने अशांतता पसरवण्याचे काम सुरू असून, नुकतीच विधान भवनातही मारहाणीची घटना घडली. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे व राज्याचे भवितव्य अंधारात गेले आहे.
या सभेसाठी बाबासाहेब भिटे, अप्पासाहेब कोहकडे, विष्णू तारडे, अनिल कासार, सुर्यकांत भुजाडी, दशरथ पोपळघट, रवींद्र आढाव, नंदकुमार तनपुरे, बाळासाहेब उंडे, किरण कडू, दिपक त्रिभुवन, बाळासाहेब आढाव, सुरेश लांबे, सुजीत वाबळे, पप्पू माळवदे, उपसभापती बाळासाहेब खुळे, चंद्रकांत पानसंबळ, राजेंद्र बोरकर, डॉ. तनपुरे कारखाना संचालक ज्ञानेश्वर कोळसे, ज्ञानेश्वर पवार, प्रमोद तारडे, ज्ञानेश्वर खुळे, गणेश गाडे, सुभाष करपे, प्रकाश भुजाडी, कृष्णा मुसमाडे, अरुण दूस, सुनिल मोरे, इंद्रभान पेरणे, आरपीआयचे विलास साळवे, कांतीलाल जगधने, दिलीप गोसावी, सतीश बोरुडे, दिपक त्रिभुवन, अनिल जाधव, महेश उदावंत, मधुकर घाडगे, निलेश जगधने, दादासाहेब खोजे, ज्ञानेश्वर जगधने, शिरीष गायकवाड, भाऊसाहेब पगारे, मच्छिद्र गुलदगड, प्रशांत शिंदे, जगदीश भालेराव, ज्ञानेश्वर पोपळघट, सौरभठंडे, गणेश, संतोष खाडे, डी. आर. पानसंबळ, किशोर जाधव, अश्विनी कुमावत, राम तोडमल, रावसाहेब पवार, कोहकडे, राजू आढाव, चांगदेव देठे, बाळासाहेब जाधव, युवराज तारडे, डॉ. रमेश गायकवाड, विजय चव्हाण, अनिल जाधव, बाबासाहेब साठे आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.