पहिल्याच चित्रपटात अहान पांडेला करोडोंचे मानधन, रणबीर-कार्तिकलाही टाकलं मागे! ‘सैयारा’चा बॉक्स ऑफिसवरही धमाका

Published on -

सैयारा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या मनात जोरदार छाप सोडली आहे. या रोमँटिक म्युझिकल फिल्ममधून यशराज फिल्म्सने बॉलिवूडमध्ये आणलेला नवीन चेहरा अहान पांडे पहिल्याच चित्रपटात यशाच्या झोतात आला आहे. चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ 18 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी तब्बल 21 कोटींपेक्षा जास्त कमाई करत बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम केला. 60 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटात अहान पांडेसोबत अनिता पड्डा प्रमुख भूमिकेत झळकत आहे.

पदार्पणातच अहानची कोटींची कमाई

अहान पांडेने ‘सैयारा’साठी सुमारे 3 ते 5 कोटी रुपये मानधन घेतले आहे. हे विशेष म्हणजे, बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या कोणत्याही अभिनेत्याच्या तुलनेत ही रक्कम अधिक आहे. रणबीर कपूरला 2007 साली आलेल्या ‘सावरिया’साठी केवळ 8 लाख रुपये मिळाले होते, तर कार्तिक आर्यनला ‘प्यार का पंचनामा’साठी फक्त 70 हजार रुपये मिळाले होते. त्यामानात अहान पांडेला चांगलेच मानधन मिळाले आहे.

अनिता पड्डाला कमी मानधन?

चित्रपटात अहानची जोडीदार अनिता पड्डाला अहानपेक्षा कमी मानधन मिळाले आहे, अशी माहिती असून, दिग्दर्शक मोहित सुरी यांनी 6 ते 8 कोटी रुपये घेतले असल्याचे समजते. मात्र, यशराज फिल्म्सने अद्याप या सर्व आकडेवारीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

अहान पांडेने पहिल्याच चित्रपटात इतकी मोठी कमाई केली असल्यामुळे त्याच्याकडून बॉलिवूडमध्ये मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. बॉक्स ऑफिसवर मिळालेलं यश, समीक्षकांकडून मिळालेलं कौतुक आणि मिळालेलं मानधन यामुळे तो चर्चेत आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!