अहिल्यानगर : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शनिवारी २२२ क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यामध्ये डाळिंबाची सर्वाधिक ६३ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १००० ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची १३ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १००० ते ५००० रुपये भाव मिळाला. संत्र्यांची साडेनऊ क्विंटल आवक झाली होती.
संत्र्यांना प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये भाव मिळाला. पपईची ७ क्विंटल आवक झाली होती. पपईला प्रतिक्विंटल ८०० ते २८०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. सीताफळाची २ क्विंटलवर आवक झाली होती. सीताफळाला प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये भाव मिळाला. दरम्यान, बाजार समितीत फळांचे भाव स्थिर आहेत.

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत अननसाची साडेचार क्विंटल आवक झाली होती. अननसाला प्रतिक्विंटल १८०० ते ४१०० रुपये भाव मिळाला. सफरचंदाची ३ क्विंटल आवक झाली होती. सफरचंदाला प्रतिक्विंटल १३ हजार ते २३ हजार ५०० रुपये भाव मिळाला. पेरूची ४८ क्विंटल आवक झाली होती. पेरूला प्रतिक्विंटल १००० ते ५५०० रुपये भाव मिळाला.
तोतापुरी आंब्याची ३० क्विंटलवर आवक झाली होती. तोतापुरी आंब्यांना २००० ते २४०० रुपये भाव मिळाला. दशेरी आंब्याची दीड क्विंटलवर आवक झाली होती. दशेरी आंब्यांना प्रतिक्विंटल ३००० रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फ्रूटची २६ क्विंटल आवक झाली होती. ड्रॅगन फ्रूटला प्रतिक्विंटल २ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
खजुराला ४५०० रुपयांपर्यंत भाव
खजुराची २ क्विंटलवर आवक झाली होती. खजुराला प्रतिक्विंटल ४५०० रुपये भाव मिळाला. केळीची ६ क्विंटलवर आवक झाली होती. केळीला प्रतिक्विंटल १६०० ते २००० रुपये भाव मिळाला.