मोबाईल नंबर फक्त संवादाचं साधन नाही, तर तुमच्या नशिबाशी जोडलेली एक अदृश्य ताकद असू शकते, हे तुम्हाला माहीत होतं का? आजच्या तंत्रज्ञानप्रधान जगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, पण त्या नंबरामागची गूढता अनेकदा आपल्या लक्षातच येत नाही. अंकशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं, तर प्रत्येक मोबाइल नंबर एक विशिष्ट ऊर्जा वाहत असतो. कधी ती ऊर्जा अनुकूल असते, कधी प्रतिकूल. त्यामुळे तुमचा मोबाईल नंबरही तुमचं भाग्य ठरवू शकतो, असा विश्वास काही ज्योतिष आणि अंकतज्ज्ञ ठेवतात.

‘रूट नंबर’ म्हणजे काय?
यामागचं गणित खरंतर फारसं कठीण नाही. मोबाईल नंबरमधील प्रत्येक अंकाचं एक विशिष्ट अर्थविश्व असतं आणि त्या सर्व संख्यांची बेरीज करून शेवटी एक एकेरी अंक मिळवला जातो. हा अंतिम अंक तुमच्या वैयक्तिक ‘रूट नंबर’शी जुळतो का, हे तपासल्यावर समजतं की तो मोबाईल नंबर तुमच्यासाठी शुभ आहे की नाही. ‘रूट नंबर’ म्हणजे तुमच्या जन्मतारखेतून मिळणारा मूलांक. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 14 तारखेला झाला असेल, तर 1 + 4 = 5. म्हणजे त्याचा रूट नंबर 5.
आता याच पद्धतीने मोबाईल नंबरच्या सर्व अंकांची बेरीज करून तो एक अंक काढायचा असतो. समजा एखाद्याचा नंबर 9891004444 आहे. या सर्व अंकांची बेरीज 45 होते आणि 4 + 5 केल्यावर अंतिम अंक 9 मिळतो. जर या व्यक्तीचा रूट नंबरही 9 असेल, तर हा मोबाईल नंबर त्याच्या जीवनात शुभ फलदायक ठरतो, असे मानले जाते.
शुभ अंक
अंकशास्त्रात 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक शुभ मानले जातात. हे अंक व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात, असा दावा केला जातो. दुसरीकडे, 2, 4, 6 आणि 8 हे अंक काहीसे संघर्ष देणारे, थोडक्यात अशुभ मानले जातात. विशेषतः मोबाईल नंबरचा शेवट 4 किंवा 8 वर होत असेल, तर काही ज्योतिषी असा इशारा देतात की अशा नंबरमुळे अनावश्यक अडथळे, त्रास, आणि मानसिक अस्थिरता निर्माण होऊ शकते.
तुमचं भाग्य तुमच्या हातात आहे, असं आपण कायम ऐकत आलोय, पण आजच्या जगात तुमचं भाग्य तुमच्या मोबाईल नंबरातही लपलेलं असू शकतं. म्हणूनच, जर तुमच्या आयुष्यात काही अनाकलनीय गोष्टी घडत असतील किंवा तुम्ही नव्या सकारात्मक ऊर्जा शोधत असाल, तर एकदा मोबाईल नंबरचं हे अंकशास्त्रीय गणित नक्की करून पाहा.