दोन तोंडाचा दुर्मिळ साप सापडला !

Ahmednagarlive24
Published:

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या जंगलांमध्ये एका पर्यावरण सल्लागाराला विचित्र रुपाचा दुर्मिळ साप आढळून आला. हा साप पाहून तो थक्कच झाला. कारण सापाला चक्क दोन तोंडे आहेत.

बर्लिंग्टन काउंटीतील हर्पेचोलॉजिकल असोसिएट्ससाठी काम करणाऱ्या दोन लोकांनी हा साप पकडला असून त्याची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सापाला आता डेव असे नाव देण्यात आले आहे.

कारण याच नावाच्या व्यक्तीने या सापाला पहिल्यांदा पाहिले होते. त्यामुळे त्याचे नाव डबल डेव ठेवण्यात आाले आहे. हा साप दिसायला अतिशय विचित्र आहे. या सापाला दोन डोकी, चार डोळे व दोन जिभा आाहे. मात्र उर्वरित शरीर एकच आहे.

या सापाचा शोध घेणारा पर्यावरण सल्लागार डेव शेंडलर याने सांगितले की, सापांसाठी जंगलांमध्ये जिवंत राहणे गेल्या काही वर्षांत अतिशय अवघड झाले आहे. हल्लीच आाढळून आलेला हा दुर्मिळ साप दोन तोंडे असल्यामुेल अतिशय संथ गतीने चालतो.

त्यामुळे अन्य प्राणी सहजपणे त्याला शिकार बनवू शकतात. हा साप आठ ते दहा इंच लांब आाहे. या सापाला जवळ ठेवण्यासाठी खास परवानगी घ्यावी लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment