जामखेड येथील दुकानात चप्पल घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा दुकानदाराने केला विनयभंग, आरोपीस १४ दिवसांची कोठडी

Published on -

जामखेड- चप्पल बदलुन घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढुन तीचा दुकान मालकाने विनयभंग केल्याची घटना जामखेड तालुक्यातील नान्नज येथे घडली. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला दुकान मालकाविरोधात विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोलिसांकडून मिळाले माहिती अशी की, एक अल्पवयीन मुलगी ही नान्नज येथील चप्पलच्या दुकानात चप्पल बदलण्यासाठी गेली होती. यावेळी संबंधित दुकानाचा मालक गफार निजाम शेख (वय ३४ वर्षे, रा. नान्नज, ता. जामखेड) याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तसेच अल्पवयीन मुलीस सदरची घटना कोणाला सांगीतली तर तुला जीवे ठार मारु अशी धमकी दिली.

न याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार घरी सांगितल्यावर तीने आपल्या वडीलांसोबत जामखेड पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दाखल केली. यानंतर शेख विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक करुन श्रीगोंदा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!