कोपरगाव- ग्रामपंचायत प्रशासनाचा कार्यभार व्यवस्थितपणे होण्यासाठी त्या ग्रामपंचायतींना नवीन इमारतीची आवश्यकता होती. त्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ लाख रुपयाप्रमाणे एकूण दोन कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र, सुसज्ज कार्यालयीन इमारत मिळावी व नागरिकांना चांगली सेवा मिळावी, या उद्देशातून महायुती शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील चासनळी, शिंगणापूर, धारणगाव, मुर्शतपूर, करंजी, दहेगाव बोलका, जेऊर पाटोदा, धोत्रे या ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतीसाठी दोन कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना गावचा कारभार करतांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी मतदार संघातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी आ. काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. मतदार संघाच्या सर्वांगिण विकासाला गती देवून या विकासाबरोबरच शासकीय पाठपुराव्यातून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील चासनळी, शिंगणापूर, धारणगाव, मुर्शतपूर, करंजी, दहेगाव बोलका, जेऊर पाटोदा, धोत्रे या ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतीसाठी दोन कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना गावचा कारभार करतांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी मतदार संघातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी आ. काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. मतदार संघाच्या सर्वांगिण विकासाला गती देवून या विकासाबरोबरच शासकीय कार्यालयाचा देखील विकास करण्यावर आ. काळे यांनी भर दिला असून अनेक शासकीय कार्यालयांना निधी देवून नागरिकांच्या व प्रशासकीय अधिकऱ्यांच्या अडचणी कायमच्या दूर केल्या आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी अडचण दूर होवून नागरिकांना सेवा मिळण्यात मोठी सोय झाली आहे.
या ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतींना प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे चासनळी, शिंगणापूर, धारणगाव, मुर्शतपूर, करंजी, दहेगाव बोलका, जेऊर पाटोदा, धोत्रे गावच्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतीसाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले.