Maharashtra News : महाराष्ट्र हे देशातील श्रीमंत राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रात हजारो कंपन्या कार्यरत आहेत. यामुळे हजारो लाखो लोकांना येथे रोजगार मिळाला आहे. यामुळे परराज्यातील अनेक तरुण-तरुणी आपल्या महाराष्ट्रात रोजगाराच्या शोधात येत असतात. विशेष बाब अशी की गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या राज्याचा विकास झपाट्याने झाला आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र राज्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची बनवायची असा पक्का निर्धार केला आहे. दरम्यान आज आपण महाराष्ट्रात किती कंपन्या आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत. एका आकडेवारीनुसार 1983 मध्ये भारतात 93,166 फॅक्टरीज होत्या. पण 2022 मध्ये ही संख्या दोन लाख 49 हजार 987 वर पोहोचली आहे. म्हणजेच देशातील फॅक्टरीजची संख्या गेल्या काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली असून आज आपण देशात सर्वात जास्त कंपन्या कोणत्या राज्यात आहेत? याची यादी पाहणार आहोत.

या राज्यांमध्ये आहेत सर्वाधिक कंपन्या
आंध्र प्रदेश : देशातील सर्वाधिक फॅक्टरी असणाऱ्या टॉप 5 राज्यांच्या यादीत आंध्र प्रदेशचा पाचवा नंबर लागतो. या राज्यांमध्ये कर्नाटक आणि तेलंगानापेक्षा अधिक कारखाने आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश राज्यात एकूण 16,925 कारखाने अस्तित्वात आहेत. येथे हजारो लाखो लोकांना रोजगाराची प्राप्ती झाली आहे. आंध्र प्रदेश मध्ये नवयुवक तरुण-तरुणींना थेट कारखान्यांमध्ये रोजगार उपलब्ध होत आहे शिवाय स्वयंरोजगाराची देखील यामुळे मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली आहे.
उत्तर प्रदेश : देशातील सर्वाधिक फॅक्टरी असणाऱ्या टॉप पाच राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेशचा चौथा नंबर लागतो. उत्तर प्रदेश हे लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. या राज्यात 17,481 कारखाने आहेत. मात्र येथील लोकसंख्या पाहता या राज्यात असणारी कारखान्यांची संख्या कमी वाटते.
महाराष्ट्र : आपल्या महाराष्ट्राचा या यादीत तिसरा क्रमांक लागतो. मीडिया रिपोर्टनुसार महाराष्ट्रात 2022 पर्यंत 26,350 कारखाने अस्तित्वात होते. हेच कारण आहे की आपल्या राज्यात देशातील वेगवेगळ्या भागांमधील लोक रोजगारासाठी येत आहेत.
गुजरात : महाराष्ट्रापेक्षा गुजरात मध्ये अधिक फॅक्टरीज कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार देशातील सर्वाधिक फॅक्टरी असणाऱ्या टॉप पाच राज्यांच्या यादीत गुजरात राज्याचा दुसरा नंबर लागतो. गुजरात मध्ये जवळपास 30 हजार कारखाने अस्तित्वात आहेत.
तामिळनाडू : या यादीत तामिळनाडू राज्याचा पहिला नंबर लागतो. 2022 मध्ये तामिळनाडू या राज्यात 39,512 इतके कारखाने अस्तित्वात होते. यामुळे तामिळनाडू या राज्यात देखील देशातील कानाकोपऱ्यातील तरुण-तरुणी रोजगारासाठी जातात. तामिळनाडूमध्ये दक्षिणेकडील लोक मोठ्या प्रमाणात कामाला आहेत. हे देखील देशातील एक श्रीमंत राज्य म्हणून ओळखले जाते. तामिळनाडू राज्यातील उद्योगामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळाली आहे.