महाराष्ट्रातील ‘हा’ नेता उपराष्ट्रपती होणार ? महाराष्ट्रातील नेता पहिल्यांदाच उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार ?

जगदीप धनखड यांनी नुकताच आपल्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे. धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सोपवला आहे. 

Published on -

Maharashtra News : काल 21 जुलै रोजी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे. धनखड यांनी प्रकृतीच्या कारणावरून राजीनामा दिला असून आता देशाचे नवे राष्ट्रपती कोण राहणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. धनखड यांनी आपला राजीनामा 21 जुलै रोजी राष्ट्रपतींकडे सादर केला आहे आणि म्हणून आता हे पद रिक्त झाले आहे.

दरम्यान, आता कालपासून संसदेचे अधिवेशन सुरू झाले आहे आणि म्हणूनच या रिक्त पडलेल्या उपराष्ट्रपती पदासाठी या अधिवेशनाच्या काळातच निवडणूक होण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य म्हणजेचं लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात.

दरम्यान उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आता महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचे नाव पुढे येत आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि तत्कालीन राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आहे.

हरिभाऊ बागडे हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय समजले जातात. यामुळे हरिभाऊ बागडे हे उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. दुसरीकडे बिहार राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून भारतीय जनता पक्ष बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती पदाची संधी देऊ शकते असेही बोलले जात आहे.

बिहारमध्ये भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रीपदासाठी आपला उमेदवार देण्याच्या तयारीत असून यासाठी नितीश कुमार यांना केंद्राच्या राजकारणात घेतले जाऊ शकते अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.

एका बिहारी व्यक्तीला देशातील दुसऱ्या सर्वोच्च पदावर बसवून भाजपा बिहारच्या विधानसभा निवडणुकीत मोठी खेळी खेळू शकते असा दावा काही राजकीय तज्ञांकडून केला जात आहे. यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे हरिभाऊ की बिहारचे नितीश कुमार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.

हरिभाऊंना संधी मिळाली तर ते महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती ठरणार

जर समजा भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना उपराष्ट्रपती पदावर बसवले तर हरिभाऊ हे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती राहणार आहेत जे की देशातील या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च पदावर बसतील.

आतापर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याच नेत्याला उपराष्ट्रपती होण्याची संधी मिळालेली नाही. मात्र आता हरिभाऊ बागडे यांचे नाव या शर्यतीत आघाडीवर आहे. यामुळे हरिभाऊ बागडे यांना खरंच उपराष्ट्रपती पदासाठी संधी दिली जाते का हे पाहणे उत्सुकतेचे राहील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!