Maharashtra New Railway Station : भारतात विमान, बस आणि रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवास केला जातो. यात बस आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. महाराष्ट्रात देखील हजारो किलोमीटर लांबीचे रेल्वे मार्ग तयार आहेत, तसेच अजूनही नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत.
देशात जवळपास साडेसात हजाराहून अधिक रेल्वे स्थानक आहेत. या सोबतच नवीन रेल्वे स्टेशन देखील तयार केले जात आहेत. एवढेच नाही तर सध्याच्या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास देखील जोरात सूरू आहे. महाराष्ट्रातील एका प्रमुख शहरातील रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार असून या स्थानकाचे रुपडे पूर्णपणे बदलणार आहे.

ह्या स्थानकाचा होणार पुनर्विकास
केंद्रातील सरकारच्या माध्यमातून अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून देशभरातील प्रमुख रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास केला जात असून याच पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ठाणे रेल्वे स्थानकाचा देखील पुनर्विकास केला जाणार आहे.
यासाठीचा प्रस्ताव तयार झाला असून हा प्रस्ताव मान्यतेसाठी पुढे पाठवण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मध्य रेल्वेने ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्याबाबतचा 949 कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्यतेसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवलेला आहे मात्र, अजून रेल्वे बोर्डाकडून या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आलेला नाही.
यामुळे ठाणे शहरातील नागरिकांकडून अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होणार की नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रलंबित प्रस्तावा बाबत संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी 23 जुलै 2025 रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भातील प्रश्न उपस्थित करत केंद्रातील सरकारचे आणि केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
रेल्वेमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावे
ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकासाचा 949 कोटी रुपयांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने लवकरात लवकर मंजूर करावा अशी मागणी खासदार म्हस्के यांनी केली आहे. यासोबतच त्यांनी ठाणे स्थानकावरून मुलुंड कडे जाणारा पादचारी पूल तातडीने बांधण्याची आवश्यकता असल्याचीही बाब सभागृहात उपस्थित केली.
एवढेच नाही तर त्यांनी हे दोन्ही प्रकल्प ठाणे शहरासाठी अति आवश्यक असून या दोन्हीही महत्त्वाच्या प्रस्तावांकडे रेल्वे मंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष द्यावे अशी विनंती सुद्धा त्यांनी यावेळी केली.