सोनई- खरवंडी येथील युवकाने पुणे, कोथरूड येथील २१ वर्षीय युवतीस पळवून आणले होते. या प्रकरणी शिंगणापूर पोलिसांनी संशयित इसमास व हरवलेल्या मुलीस कोथरूड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत शिंगणापूर पोलीस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी की, कोथरूड, पुणे येथील २१ वर्षीय युवती हरवल्याची फिर्याद दाखल झालेली होती. पुणे पोलिसांनी सूत्रे हलवत हरवलेली मुलगी खरवंडी (ता. नेवासा) येथील युवकाने पळून आणले असल्याची माहिती मिळाली. त्यांनी शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांना ही माहिती सांगितली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके यांनी त्वरित पोलीस पथकाला खरवंडीत पाठवून हरवलेली युवती व संशयित संतोष कचरू जाधव (रा. खरवंडी) याला ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी कोथरूड पोलीस ठाण्याच्या अंमलदार यांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल ठुबे, पोलीस कॉन्स्टेबल हिवाळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल वृषाली गर्जे यांनी ही कारवाई केली.