‘हा’ आहे जगातील सर्वात सुरक्षित देश! इथे तुरुंगच नाही आणि गुन्हेही होत नाहीत, कारण…

Published on -

तुम्ही कधी कल्पना केली आहे का, की एखादा देश असा देखील असू शकतो जिथे गुन्हे होत नाहीत? ना पोलिसांची धावपळ, ना न्यायालयांमध्ये खटले, ना कोठड्या, ना तुरुंग! ही कल्पना जरी स्वप्नवत वाटत असली तरी ती एका देशाच्या बाबतीत खरी ठरते आणि तो देश आहे व्हॅटिकन सिटी.

व्हॅटिकन सिटी

व्हॅटिकन सिटीजगातल्या सगळ्यात छोट्या सार्वभौम देशांपैकी एक, पण त्याचं वैशिष्ट्य त्याच्या आकारामुळे नव्हे, तर त्याच्या सामाजिक शिस्तीमुळे अधोरेखित होतं. अवघ्या 0.44 चौरस किलोमीटरमध्ये वसलेला हा देश रोम शहराच्या हृदयात आहे, मात्र त्याचं अस्तित्व एक स्वतंत्र आणि अत्यंत सुसंस्कृत राष्ट्र म्हणून  मान्य केलं जातं. येथे राहणारी लोकसंख्या फारच मर्यादित असून ती मुख्यतः धार्मिक सेवेसाठी नियुक्त झालेल्या व्यक्तींपासून बनलेली आहे. यामुळेच इथली जीवनशैली अत्यंत शिस्तबद्ध, भक्तिमय आणि नियमांशी नातं जपणारी आहे.

या देशामध्ये तुरुंग नाही, ही गोष्ट बाहेरच्या जगाला जितकी अचंबित करते, तितकीच इथल्या नागरिकांसाठी ती नैसर्गिक वाटते. इथे गुन्हे करण्याची शक्यता इतकी नगण्य आहे की कायमस्वरूपी तुरुंगाची गरजच पडत नाही. काही किरकोळ प्रकरणांसाठी मात्र प्राथमिक चौकशीसाठी डिटेन्शन सेल ठेवले गेले आहेत, पण गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत न्यायप्रक्रिया ही इटालियन न्यायव्यवस्थेच्या हातात सोपवली जाते.

सुरक्षा व्यवस्था कशी असते?

सुरक्षा व्यवस्थेचा उल्लेख केला तर, तोही काहीसा अद्वितीयच आहे. इथे पोपची सुरक्षा करणाऱ्या ‘स्विस गार्ड्स’ नावाच्या युनिटकडून उच्चतम सुरक्षा दिली जाते. या सुरक्षा व्यवस्थेमुळे कोणताही संशयित प्रकार घडण्यापूर्वीच त्याला थांबवले जाते. त्यामुळे या देशात चोऱ्या, फसवणूक किंवा हिंसाचारासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण जवळपास शून्यावर आले आहे.

व्हॅटिकन सिटीमध्ये एखादा गुन्हा झाला तरी तो बहुधा खिसा कापण्यासारखा किरकोळ असतो, आणि अशा प्रकरणांत आरोपींना इटलीच्या न्यायालयात आणि तुरुंगात पाठवले जाते. त्यामुळे या देशाने स्वतःची न्यायव्यवस्था शिस्तबद्ध ठेवत बाह्य मदतीचा योग्य वापर केला आहे.शांतता, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याच्या अधारावर उभा असलेला व्हॅटिकन सिटी आज जगासाठी एक आदर्श उभा करतो आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!