अहिल्यानगर : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शुक्रवारी विविध फळांची १३९ क्विंटल आवक झाली होती. यावेळी मोसंबीला ५००० रुपये, तर डाळिंबांना २५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. पपईला प्रतिक्विंटल ८०० ते ३००० रु पयांपर्यंत भाव मिळाला.
अहिल्यानगर बाजार समितीत शुक्रवारी डाळिंबांची ६८ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची ३४ क्विंटलवर आवक झाली होती. यावेळी मोसंबीला १ हजार रुपये ते ५००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. सफरचंदाची ९ क्विंटलवर आवक झाली होती.

सफरचंदाला प्रतिक्विंटल १५ हजार ते २३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. पपईची ११ क्विंटल आवक झाली होती. पपईला १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. अननसाची ५ क्विंटलवर आवक झाली होती. अननसाला २००० ते ५००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. पेरूची १४७ क्विंटल आवक झाली होती. पेरूला क्विंटल १ हजार ते ५ हजार रुपये भाव मिळाला. तोतापुरी आंब्यांची ६० क्विंटल आवक झाली होती.
तोेतापुरी आंब्यांना क्वंटल २००० ते ३००० रुपये भाव मिळाला. निलम आंब्यांची ५ क्विंटलवर आवक झाली होती. निलम आंब्यांना प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये भाव मिळाला. दशेरी आंब्यांची २ क्विंटल आवक झाली होती. दशेरी आंब्यांना प्रतिक्विंटल ३००० रुपये भाव मिळाला. केळीची ११ क्विंटलवर आवक झाली होती.
केळीला १५०० ते २००० रुपये भाव मिळाला. संत्र्यांची १क्विंटल आवक झाली होती. संत्र्यांना ३००० ते ५००० रुपये भाव मिळाला. सीताफळाची ९ क्विंटल आवक झाली होती. सीताफळांना १००० ते ५००० रुपये भाव मिळाला. कलिंगडाची २ क्विंटल आवक झाली होती. कलिंगडाला ४०० ते ५०० रुपये भाव मिळाला. ड्रॅगनची २३ क्विंटल आवक झाली होती. ड्रॅगन फ्रूटला ४००० ते १३ हजार रुपये भाव मिळाला.