अहिल्यानगर : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी हिरव्या मिरचीची १११ क्विंटलवर आवक झाली होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल ३००० ते ८००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. लसणाची १९ क्विंटल आवक झाली होती. लसणाला प्रतिक्विंटल ५००० ते १३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवग्याची ८९ क्विंटलवर आवक झाली होती. शेवग्याला प्रतिक्विंटल १००० ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. लिंबांची ३१ क्विंटल आवक झाली. लिंबाला प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
मेथीच्या ५ हजार ५७२ जुड्यांची आवक झाली होती. मेथी जुडीला ४ ते १० रुपयांपर्यंत भाव मिळाला. कोथिंबिरीच्या ९ हजार ३७ जुड्यांची आवक झाली. कोथिंबिरीच्या जुडीला २ ते ६ रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेपूच्या ३६८४ जुड्यांची आवक झाली होती. यावेळी शेपू जुडीला २ ते ७ रुपयांपर्यंत भाव मिळाला.

पालकच्या ७८५ जुड्यांची आवक झाली होती. पालक जुडीला ५ ते ७ रुपये भाव मिळाला. करडी भाजीच्या ७५ जुड्यांची आवक झाली होती. करडी जुडीला ५ ते ८ रुपये भाव मिळाला. शुक्रवारी भाजीपाल्याची २७६७ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ४८० क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती.
यावेळी टोमॅटोला ६०० ते ३००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. वांग्याची ७९ क्विंटल आवक झाली होती. यावेळी वांग्यांना ५०० ते ३००० रुपये भाव मिळाला. बटाट्याची ३७३ क्विंटल आवक झाली होती. बटाट्याला १२०० ते १८०० रुपये भाव मिळाला. काकडीची १९२ क्विंटल आवक झाली होती.
काकडीला प्रतिक्विंटल ३०० ते १३०० रुपये भाव मिळाला. गवारीची १९ क्विंटल आवक झाली होती. गवारीला ४००० ते १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. फ्लॉवरची ११२ क्विंटल आवक झाली होती. फ्लॉवरला ५०० ते २५०० रुपये भाव मिळाला.