Vande Bharat Railway : वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मुंबई, पुणे, दौंड, कुर्डूवाडी आणि सोलापूर येथील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास राहील. कारण रेल्वे बोर्डाने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या या मार्गांवर 16 डब्ब्यांची वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहे. मात्र लवकरच या मार्गावर 20 डब्यांची वंदे भारत ट्रेन धावणार असल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून या भागातील प्रवाशांनी रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

कधीपासून होणार अंमलबजावणी?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्यात सध्या मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या अकरा मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे.
यातील सीएसएमटी ते सोलापूर आणि सीएसएमटी ते शिर्डी या वंदे भारतरत्न एकाच दिवशी सुरू झाल्यात. सीएसएमटी ते सोलापूर ही गाडी पुण्या मार्गे धावते. ही गाडी 16 डब्यांची आहे मात्र या गाडीला मिळणाऱ्या प्रवाशांच्या प्रतिसादामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या वाढली पाहिजे अशी मागणी येथील प्रवाशांची होती.
दरम्यान आता ऑगस्ट महिन्यापासून या मार्गावर 20 डब्यांची वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वे बोर्डाने या संदर्भातील निर्णय नुकताच जाहीर केला आहे. या निर्णयानुसार 28 ऑगस्ट 2025 पासून मुंबई – सोलापूर मार्गावर वीस डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे.
या निर्णयामुळे सोलापूर ते मुंबई आणि मुंबई ते सोलापूर हा प्रवास वेगवान आणि सुरक्षित होईल अशी आशा प्रवासी संघटनांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यांची संख्या 16 वरून 20 केली जाणार आहे , यामुळे फक्त पुणेकरांनाच फायदा होईल असे नाही तर या निर्णयाचा सोलापूर शहर जिल्ह्यासह कुर्डूवाडी, दौड व मुंबई येथील नागरिकांना सुद्धा फायदा मिळणार आहे.