पाथर्डी- हिंदू धर्मशास्त्रामध्ये सर्व सकारात्मक धार्मिक व अध्यात्मिक विधी दिव्याच्या साक्षीने केले जातात. शुभकार्याची सुरुवातही दीपप्रज्वलाने होते. विवाह सुद्धा अग्निसाक्षी झालेला पवित्र मानला जातो. आषाढ अमावस्येला दीपपूजन करत कल्याणाची प्रार्थना शक्तीपुढे केली जाते. तालुक्यातील मोहटा देवस्थान मध्ये आज पारंपारिक पद्धतीने दीपपूजन वेदमंत्राच्या घोषात करण्यात आले.
मुख्य पुरोहित भूषण साकरे, भास्कर देशपांडे व बाळासाहेब क्षीरसागर यांनी पूजा विधीचे पुरोहित्य केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांच्या हस्ते दीपपूजा संपन्न झाली. तेल व तुपाच्या भरलेल्या समया संपूर्ण गाभाऱ्या मांडण्यात आल्याने अत्यंत पवित्र, मनोहर दृश्य गाभाऱ्याचे होते. भाविकांनी सुद्धा अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने हा संपूर्ण विधी अनुभवला. विविध फळे भाज्या व तळणीच्या पदार्थांचा नैवेद्य देवीला दाखवण्यात आला.

दारिद्र्य, दुःख, दैन्य, रोग, शत्रू पिडा, संकटे अशा सर्व त्रिविधतापांचा व दुष्ट बुद्धीचा नाश ज्योतीच्या तेजाने व्हावा. काळाकुट्ट अंधकार नष्ट होऊन संपूर्ण जीवन व सृष्टी पवित्र तेजाने उजळून निघावी.
तेजपुंज वातावरणातून सकारात्मक विचार, सद्बुद्धी, दीर्घायुष्य, ऐश्वर्य, धर्मशास्त्राची कास धरत जीवन जगण्याची बुद्धी, धर्म, राष्ट्र, पशुपक्षी जीवसृष्टीचे रक्षण करण्याची शक्ती मातृ स्वरूप असलेल्या आदि शक्ती जगन्नमातेने द्यावी अशी प्रार्थना केली जाऊन सृष्टीतील सर्व नकारात्मक भाव असूरी शक्तींचा नाश, अमावस्येच्या दीप तेजाने नष्ट व्हावा. अशी कामना केली जाते. श्रावण मासाची पूर्वसंध्या असल्याने पवित्र धर्मकार्याला या मासापासून सुरुवात करण्यासाठी प्रथमदीप पूजन केले जाते.
शास्त्रामध्ये या दिवशी पूर्वजांसाठी म्हणजे पितरांसाठी तर्पण विधी, श्राद्धविधी अत्यंत श्रेष्ठ सांगितला आहे. त्यामुळे पवित्र नद्या, नद्यांचा संगम, तीर्थक्षेत्रे या ठिकाणी व कोठेही जाण्यास न जमल्यास घरी पारंपारिक पद्धतीने दीप पूजन विधी सर्वश्रेष्ठ समजला जातो. या दिवशीच्या विधीने अन्नदान, दीपदान व दीपपूजनाने पितर संतुष्ट होतात. केवळ दीपपूजनाने सुद्धा मो