संगमनेर-महायुती सरकार हे केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले असून, त्यांच्या चुकीच्या कारभारामुळे महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू झाली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटी सदस्य आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
राज्यातील सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत महिलांना २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती, परंतु अद्याप कोणालाही याचा लाभ मिळालेला नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत आश्वासने दिली गेली, मात्र प्रत्यक्षात फसवणूक झाली आहे. आमदारांमध्ये मारामाऱ्या सुरू आहेत, मंत्र्यांनी कसे वागावे हे सांगण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

अनेक मंत्री भ्रष्टाचार करत आहेत आणि मुख्यमंत्री त्यांच्या बचावासाठी पांघरूण घालत आहेत, असा आरोप थोरात यांनी केला. थोरात पुढे म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने तीन हजार कोटी रुपयांचे घोटाळे निदर्शनास आणले, त्यामुळे वर्क ऑर्डर रद्द करावी लागली. तरीही सरकारकडून यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही.
आमदारांचे भाऊ गोळीबार करत आहेत, पुरोगामी विचारांचे प्रवीण गायकवाड यांच्यावर हात उचलला जातो, बीडमध्ये भयावह परिस्थिती आहे. विधानभवनात गुंड शिरतात, हाणामारी करतात आणि भाजप त्यांना संरक्षण देते, हे अतिशय धोकादायक आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार काढून घेण्यासाठी जन सुरक्षा विधेयक सरकारने संमत केले आहे.
देशातील इतर राज्ये प्रगती करत असताना, पुरोगामी महाराष्ट्र अधोगतीकडे वाटचाल करत आहे, हे चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. राज्यातील ठेकेदारांचे एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बिले बाकी आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यांसारख्या गरीबांसाठीच्या योजनांसाठी सात महिन्यांपासून पैसे मिळालेले नाहीत.
स्थानीक स्वराज्य संस्थांच्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी आमदारांना निधी दिल जात असून, दुजाभावाचा आरोप त्यांर्न केला. मंत्री बेताल वक्तव्य करत आहेत, आमदारही अस्वस्थ आहेत नगरविकास विभागाचा निधी मुख्यमंत्र स्वतः ठरवणार आहेत. त्यामुळं मंत्रिमंडळात अविश्वासाचे वातावरण आहे.
एका महिन्यात तीन तलवार्र कशा टिकणार? असा प्रश्न त्यांनं विचारला. आगामी काळात स्थानीव स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्य पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं बैठक होऊन राज ठाकरे यांच्य समावेशाबाबत निर्णय घेतला जाईल असेही ते शेवटी म्हणाले.